प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित राज्यांना एक पत्र लिहून कोरोना साथरोगासंदर्भात नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यांनी कोरोना लॉकडाऊननचे नियम शिथिल करताना काळजी बाळगावी. अनलॉकची प्रक्रिया राबवताना कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी, तपासणी-उपचार आणि लसीकरण या पाच बाबींचा अवलंब कटाक्षाने करावा, असे गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. अनलॉक प्रक्रिया अत्यंत सावधगिरीने, सतर्कतेने आणि प्रत्यक्षातील परिस्थितीच्या आकलनानुसार केली जावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

  दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित राज्यांना एक पत्र लिहून कोरोना साथरोगासंदर्भात नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यांनी कोरोना लॉकडाऊननचे नियम शिथिल करताना काळजी बाळगावी. अनलॉकची प्रक्रिया राबवताना कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी, तपासणी-उपचार आणि लसीकरण या पाच बाबींचा अवलंब कटाक्षाने करावा, असे गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. अनलॉक प्रक्रिया अत्यंत सावधगिरीने, सतर्कतेने आणि प्रत्यक्षातील परिस्थितीच्या आकलनानुसार केली जावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

  बाजारातील गर्दीवर नियंत्रण आवश्यक

  काही राज्यांमध्ये नियम शिथिल केल्यानंतर कोरोना नियमावलीची पायमल्ली करत बाजारांमध्ये तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर नेहमीसारखीच गर्दी दिसून येत असल्याचेही भल्ला यांनी पत्रात अधोरेखित केले आहे. यावर नियंत्रण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

  लसीकरणाची गती वाढवा

  दरम्यान, संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी सध्य परिस्थितीमध्ये कोरोना लसीकरणाची मोहिम अत्यंत महत्त्वाची असून राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी लसीकरणाची गती आणखी वाढवायला हवी असेही भल्ला यांनी पत्रात नमूद केले आहे.

  आरोग्यमंत्रीही म्हणतात…

  गेल्यावर्षीही साथरोग रोखण्यासाठी केंद्र सरकारने दिवसरात्र काम केले होते. यावर्षी मात्र लस घेतल्यानंतर लोकं बेपर्वा झाले आहेत. कोरोना आपले रूप बदलत असताना लोकं कोरोनापासून बचावाचे नियम पायदळी तुडवित आहेत. त्यामुळेच देशाला दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले.

  हे सुद्धा वाचा