दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; अभ्यासक्रमात ३० टक्के कपात होणार

सीबीएसअर् बोर्डाच्या दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमात सुमारे ३० टक्के कपात करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये सध्या तरी असे झालेले नाही, परंतु तिथेही अभ्यासक्रम कमी होण्याची शक्यता आहे.

दिल्ली :  केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंगळवारी लाईव्ह येऊन सीबीएसई बोर्ड परीक्षेविषयी अनेक गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. यात हेही स्पष्ट झाले की, सीबीएसईच्या परीक्षा फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात येणार नाही. या निर्णयाचे सर्वांकडूनच स्वागत करण्यात आले.

याशिवाय विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी आणखी एक बातमी ही आहे की, सीबीएसअर् बोर्डाच्या दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमात सुमारे ३० टक्के कपात करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये सध्या तरी असे झालेले नाही, परंतु तिथेही अभ्यासक्रम कमी होण्याची शक्यता आहे.

शिक्षणमंत्र्यांनी कोविड-१९ ची परिस्थिती पाहता पुढीलवर्षी फेब्रुवारीपर्यंत इयत्ता दहावी व बारावीसाठी परीक्षेच्या आयोजनास नकार देण्यात आला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, परीक्षांच्या कार्यक्रमावर योग्य विचारविनिमय करून व परिस्थितीचे आकलन झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.

दरम्यान, परीक्षा ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल, याबाबत शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. त्यांनी याविषयी स्पष्टीकरण देत सांगितले की, अनेक मुलांकडे परीक्षा देण्याची साधने नाहीत व नेटवर्कचीही अडचण होऊ शकते.