राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे मोठे वक्तव्य

राजकीय भवितव्याचा विचार केला जाईल. माझे पाठीराखे, समर्थक यांच्याशी बोलेल. साडेनऊ वर्ष मी मुख्यमंत्रिपदी होतो आता योग्य वेळ येईल तेव्हा राजकीय भविष्याचा निर्णय घेईल

    नवी दिल्ली: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग(Chief Minister Capt Amarinder Singh) यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपर्द केला.

    ”माझ्या नेतृत्वावर शंका घेण्यात आली. मला अपमानित झाल्यासारखे वाटले दोन महिन्यात तीनदा आमदारांना बोलावण्यात आलं. ज्यांच्यावर पक्षनेतृत्वाला विश्वास त्यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात येईल, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

    राजकीय भवितव्याचा विचार केला जाईल. माझे पाठीराखे, समर्थक यांच्याशी बोलेल. साडेनऊ वर्ष मी मुख्यमंत्रिपदी होतो आता योग्य वेळ येईल तेव्हा राजकीय भविष्याचा निर्णय घेईल, असे सूचक वक्तव्य कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलं आहे. त्यांच्या या गुगलीमुळे राजकीय वर्तुळात अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. दरम्यान, राजीमाना दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.