प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

हिमालय पर्वतरांगात बर्फवृष्टीला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून थंडीचा तडाखा वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे(Cold snap since mid-November).

    दिल्ली : हिमालय पर्वतरांगात बर्फवृष्टीला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून थंडीचा तडाखा वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे(Cold snap since mid-November).

    राजधानी दिल्लीमध्ये किमान तापमान 15 अंश सेल्सियसपर्यंत खाली आले असून कमाल तापमान 30 अंशांच्या आसपास नोंदविले जात आहे. हिमालयातून येत असलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे पुढील तीन ते चार दिवसांत दिल्ली परिसरातील थंडीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

    उत्तर भारतातील हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सकाळच्या वेळचा गारवा वाढला आहे. उत्तराखंडमध्ये डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत असून त्यामुळे मैदानी भागातील तापमान झपाट्याने कमी होऊ लागले आहे.