काळजी वाढली भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ ; बाधितांचा आकडा ५० हजारांच्या पुढे

देशभरात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आणि आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याचे चित्र पाहायला मिळाले .

    नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसरी लाट ओसरलेली पाहायला मिळालेला असताना दुसरीकडं अचानक दिवसापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे समोर आली आहे. दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कालही ५० हजारांच्या पुढे असल्याचे आढळून आले त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
    मागच्या २४ तासात देशभरात ५१,६६७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून १ हजार ३२९ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात ६ लाख १२ हजार ८६८ सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातच आता भारतात नव्या व्हेरीएंटचे रुग्ण आढळून येत असल्याने भीतीचं वातावरण पसरले आहे.

    भारतात आतापर्यंत ३ कोटी०१ लाख ३४ हजार ४४५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच दररोज कमी होत असलेली रुग्ण संख्या अचानक गेल्या काही दिवसात वाढायला लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच भारतात आतापर्यंत ३ लाख ९३ हजार ३१० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
    देशभरात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आणि आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याचे चित्र पाहायला मिळाले .