sonia gandhi video viral

दिल्लीत (Delhi) काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात स्थापना दिनाचा (Congress Foundation Day Program) सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोनिया गांधी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पोहोचल्या (Congress Flag Fall Off While Hoisting By Sonia Gandhi) असता विचित्र घटना घडली.

    राष्ट्रीय काँग्रेसचा आज १३७वा स्थापना दिन (Congress Foundation Day) आहे. २८ डिसेंबर १८८५ रोजी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. यानिमित्ताने देशभर काँग्रेस पक्षातर्फे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. दिल्लीत (Delhi) काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात स्थापना दिनाचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोनिया गांधी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पोहोचल्या असता विचित्र घटना घडली.


    काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी झेंडा फडकवण्यासाठी दोरी खेचली. मात्र यावेळी झेंडा फडकण्याऐवजी खांबावरून खाली पडला आणि त्यांच्या हातातच आला. तेव्हा कार्यकर्त्यांनी पुन्हा झेंडा नीट लावल्यावर ध्वजारोहण पार पडले. दरम्यान, सोनिया गांधी यांचा ध्वजारोहणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक काँग्रेस पक्षावर खूप टीका करत आहेत.