इंधन दरवाढीसाठी काँग्रेस जबाबदार ; पेट्रोलियम मंत्र्यांचा गंभीर आरोप

इंधन दरवाढीचा (Petrol Diesel Prices) पुन्हा एकदा भडका उडाला आहे. अशातच पेट्रोल-डिझेल १०० पार आणि इंधन दरवाढीसाठी काँग्रेस (Congress ) जबाबदार असल्याचं म्हणत धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसने २०१४ पूर्वी ऑईल बाँडच्या रुपाने आमच्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज सोडले, त्यामुळे आता आपल्याला मूळ रक्कम आणि व्याज भरावे लागणार आहे. हे तेलाच्या किंमतीतील वाढीचे एक प्रमुख कारण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. आपल्या आवश्यक असणारे ८० टक्के तेल बाहेरून आयात करावे लागते, असं देखील धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.

    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्य्या तेलाच्या किमतींमुळे पेट्रोल-डिझेल महागले आहे. पुढील वर्षापर्यंत कच्चे तेल १०० डॉलर प्रतिबॅरेल एवढे महाग असेल, असा तज्ज्ञांचा होरा आहे. कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. याच दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी या इंधन दरवाढीबद्दल खुलासा केला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीसाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसला जबाबदार धरलं आहे.

    इंधन दरवाढीचा (Petrol Diesel Prices) पुन्हा एकदा भडका उडाला आहे. अशातच पेट्रोल-डिझेल १०० पार आणि इंधन दरवाढीसाठी काँग्रेस (Congress ) जबाबदार असल्याचं म्हणत धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसने २०१४ पूर्वी ऑईल बाँडच्या रुपाने आमच्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज सोडले, त्यामुळे आता आपल्याला मूळ रक्कम आणि व्याज भरावे लागणार आहे. हे तेलाच्या किंमतीतील वाढीचे एक प्रमुख कारण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. आपल्या आवश्यक असणारे ८० टक्के तेल बाहेरून आयात करावे लागते, असं देखील धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.

    १८  महिन्यांपर्यंत खनिज तेलाचे दर चढत्या भाजणीचे राहणार आहेत. तेलाचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त असे व्यस्त प्रमाण असल्याने पुरवठ्यावर परिणाम होणे अपेक्षित आहे. त्यामुळे तेलाच्या किमती वाढतील, असा अंदाज आहे. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती ६३ डॉलपर्यंत स्थिरावतील असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, सद्य:स्थितीत ७५ डॉलर प्रतिबॅरेल अशी किंमत आहे