प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

भारतीय गुप्तचर यंत्रणेने मलेशियातील एका रोहिंग्या दहशतवादी संघटनेच्या कटकारस्थानाचा भंडाफोड केला आहे. मलेशियामधील रोहिंग्या दहशतवादी संघटना भारतात दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार भारतात हल्ला करण्यासाठी ही संघटना महिलेचा वापर करण्याची शक्यता आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांना फरार इस्लामिक प्रचारक झाकीर नाईक याचा संबंध असलेल्या आर्थिक देवाण-घेवाणीची माहिती मिळाली आहे. यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणेकडून काही राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिल्ली (Delhi).  भारतीय गुप्तचर यंत्रणेने मलेशियातील एका रोहिंग्या दहशतवादी संघटनेच्या कटकारस्थानाचा भंडाफोड केला आहे. मलेशियामधील रोहिंग्या दहशतवादी संघटना भारतात दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार भारतात हल्ला करण्यासाठी ही संघटना महिलेचा वापर करण्याची शक्यता आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांना फरार इस्लामिक प्रचारक झाकीर नाईक याचा संबंध असलेल्या आर्थिक देवाण-घेवाणीची माहिती मिळाली आहे. यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणेकडून काही राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महिलेचा वापर, म्यानमारमध्ये प्रशिक्षण
रोहिंग्यांशी संबंधित एक दहशतवादी संघटना हल्ल्याची तयारी करत असल्याचे गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीच्या आधारे उघड झाले आहे. या माहितीनुसार, महिलेच्या नेतृत्वातील एक दहशतवादी संघटना पुढील काही आठवड्यांमध्ये भारतातील शहरांमध्ये हल्ले करू शकतात. या संघटनेला म्यानमारमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे.

झाकीर नाईक कनेक्शन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांनी या संबंधी अनेक राज्यांना सावध केले आहे. दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालच्या पोलिसांना आणि गुप्तचर यंत्रणांना याची माहिती देण्यात आली आहे. यात 2 लाख अमेरिकन डॉलर्सची देवाण-घेवाण झाल्याचे सांगितले जात आहे. या व्यवहाराचा संबंध भारताशी आहे. तसचे याचे धागेदोरे वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकीर नाईक आणि कौलालंपूरचा रोहिंग्या नेता मोहम्मद नसीर यांच्याशी जुळलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या पैशांच्या व्यवहारातील काही भाग एका चैन्नईच्या संशयिताकडे पोहोचलेला आहे. ही व्यक्ती हवाला डीलर असल्याचे मानले जात आहे.

डिसेंबर अखेरीसपर्यंत बांगलादेशमार्गे येणार भारतात
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, भारतात हल्ला करण्याच्या तयारीत असलेला दहशतवाद्यांचा हा समूह डिसेंबरच्या मध्यावर किंवा अखेरीस बांगलादेशमार्गे भारतात येऊ शकतो. या हल्ल्याच्या योजनेत सहभागी असलेली महिला नेमकी कोण आहे याबाबत माहिती मिळालेली नाही, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेला याच वर्षी मलेशियाहून म्यानमारला प्रशिक्षणासाठी पाठवले गेले होते. गुप्तचर यंत्रणांनी राज्यांना सावधानतेचा इशारा देताना, हे दहशतवादी अयोध्या, बोधगया, पंजाब आणि श्रीनगरमध्ये हल्ला करू शकतात, असे सांगितले आहे. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयी संबंधित काही लोक या दहशतवादी समूहाला मदत करू शकतात, असा गुप्तचर यंत्रणांचा संशय आहे. यामुळे पीएफआयशी संबंधित लोकांवर लक्ष ठेवण्याची सूचना गुप्तचर यंत्रणांनी केली आहे.