कोरोनामुळे गरिबी वाढली; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का तर मध्यमवर्गीयांचे आर्थिक बजेट कोलमडले

मागील वर्षभरात ३ कोटी २० लाख लोक मध्यम वर्गातून बाहेर फेकल्या गेल्याची धक्कादायक बाब या अहवालातून उघड झाली आहे. बेरोजगारी वाढल्याने लोकांच्या आर्थिक विपन्नावस्थेमध्ये भर पडल्याचेही त्यातून दिसून येत आहे. ज्यांचे रोजचे उत्पन्न हे १० ते २० डॉलरदरम्यान (साधारणपणे ७०० ते १४०० रुपये) होते अशा देशांतील मध्यमवर्गीयांची संख्या ३ कोटी २० लाखांनी घटली आहे, असे प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

    दिल्ली :  कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे. जगभरातील जवळपास सर्वच देशांची अर्थव्यवस्था कोरोनामुळे रसातळाला गेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना काळात भारतातील गरिबांची संख्या दुपटीने वाढली असून मध्यमवर्गीयांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे, असा खुलासा अमेरिकेतील नॉन प्रॉफिट प्यू रिसर्च संघटनेच्या अहवालातून झाला आहे.

    मागील वर्षभरात ३ कोटी २० लाख लोक मध्यम वर्गातून बाहेर फेकल्या गेल्याची धक्कादायक बाब या अहवालातून उघड झाली आहे. बेरोजगारी वाढल्याने लोकांच्या आर्थिक विपन्नावस्थेमध्ये भर पडल्याचेही त्यातून दिसून येत आहे. ज्यांचे रोजचे उत्पन्न हे १० ते २० डॉलरदरम्यान (साधारणपणे ७०० ते १४०० रुपये) होते अशा देशांतील मध्यमवर्गीयांची संख्या ३ कोटी २० लाखांनी घटली आहे, असे प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

    कोरोनाकाळात देशातील मध्यमवर्गीयांची संख्या ६ कोटी ६० लाखांपर्यंत खाली आली असून संसर्ग येण्यापूर्वी ती ९ कोटी ९० लाख एवढी होती. गेल्यावर्षी देशातील गरिबांची संख्या ५.९ कोटी होती, ती लवकरच १३.४ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे.