bramhos supersonic missile

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताची आणखी एक ओळख म्हणजे शस्त्रास्त्रांची आयात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश. स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वसंरक्षणासाठी भारताने सुरुवातीपासून बहुतांश शस्त्रास्त्रे ही आयात करण्यावर भर दिला आहे. शस्त्रास्त्रांची निर्यात करणार देश... भारत आपली आपली नवी ओळख लवकरच निर्माण करणार आहे. भारताचे ‘ब्रह्मोस’ फिलिपिन्सला निर्यात केले जाणार आहे(Countries to export arms India will create its new identity; ‘Brahmos’ will be given to the Philippines).

  दिल्ली : जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताची आणखी एक ओळख म्हणजे शस्त्रास्त्रांची आयात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश. स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वसंरक्षणासाठी भारताने सुरुवातीपासून बहुतांश शस्त्रास्त्रे ही आयात करण्यावर भर दिला आहे. शस्त्रास्त्रांची निर्यात करणार देश… भारत आपली आपली नवी ओळख लवकरच निर्माण करणार आहे. भारताचे ‘ब्रह्मोस’ फिलिपिन्सला निर्यात केले जाणार आहे(Countries to export arms India will create its new identity; ‘Brahmos’ will be given to the Philippines).

  लढाऊ विमाने, मालवाहू विमाने, हेलिकॉप्टर, तोफा, रणगाडे, युद्धनौका अशी प्रमुख शस्त्रास्त्रे आपण मोठ्या प्रमाणावर आयात केली. विशेषतः शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आयात करण्यावर भारताने भर दिला. मात्र गेल्या काही वर्षात आपण संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत हळुहळु स्वावलंबी होत असून काही प्रमाणात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर स्वबळावर बनवत आहोत. आता तर क्षेपणास्त्रे, युद्धनौका बनवण्याच्या बाबतीत स्वावलंबी झालो आहोत.

  यामधील ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र आता लवकरच निर्यात करण्याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. याबाबत फिलिपिन्स देशाशी चर्चा अंतिम टप्प्यात असून कोणत्याही क्षणी, कधीही या कराराबाबत घोषणा होऊ शकते.

  चीनला शह देणार

  फिलिपिन्स देशाशी गेल्या काही वर्षात मैत्रीचे संबंध प्रस्तापित झाले असून व्यापार क्षेत्रात सहकार्याची भूमिका आधीपासून घेतली जात आहे, आता त्यात संरक्षण क्षेत्राची भर पडली आहे. विशेषतः चीनच्या दक्षिण समुद्रात चीनचा वाढता हस्तक्षेप लक्षात घेता फिलिपिन्सने भारताशी संरक्षण क्षेत्राबाबत संबंधआणखी बळकट करण्यावर भर दिला आहे. याआधीच भारताच्या युद्धनौका फिलिपिन्स देशाला नियमित भेट देत असून यानिमित्ताने भारत चीनला शह देण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्यास चीनला शह देण्याची एक मोठी संधी फिलिपिन्सला मिळणार आहे.

  ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र प्रभावशाली

  जगात विविध प्रकारची क्रूझ क्षेपणास्त्र कार्यरत आहेत. यामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे इतरांपेक्षा वेगळे ठरते. ब्रह्मोस हे जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र आहे, ध्वनीच्या तीनपट वेगाने हे प्रवास करू शकते, तर 290 किलोमीटरपर्यंत अचुक मारा करू शकते. यामुळे हे क्षेपणास्त्र रडारवर शोधणे आणि त्याला भेदणे हे अत्यंत अवघड आहे. भारताच्या लष्कर, नौदल, वायुदलामध्ये विविध ठिकाणी हे क्षेपणास्त्र याआधीच कार्यरत आहे. आता तर ब्रह्मोस क्षेपणास्त्राची नवी आवृत्ती विकसित केली जात आहे.

  ध्वनीच्या चारपट एवढ्या प्रचंड वेगाने आणि 400 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अधिक अंतरावर मारा करण्याची क्षमता नव्या ब्रह्मोसमध्ये असेल. भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकसित केले आहे. ब्रह्मोसच्या निमित्ताने भारत पहिल्यांदाच एखादे मोठे शस्त्र निर्यात करणार आहे. फक्त फिलिपिन्स नाही तर इंडोनेशिया देशाने सुद्धा ब्रह्मोस क्षेपणास्त्र घेण्याबाबत उत्सुकता दाखवली आहे.

  हे सुद्धा वाचा