प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

दिल्ली (Delhi). पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या पुलवामा हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या सीमेत शिरून सर्जिकल स्ट्राईक केला. यात शेकडो दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी हूरसदनी पाठविले. पाकिस्तानी सैनिक आणि तेथील राजनेत्यांच्या मनातून भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची धडकी अद्यापही कायम आहे. आता भारतीय वायूदल राफेलच्या ताकदीने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करणार का? ही चिंता पाकला सतावते आहे. पाकच्या रावळपिंडी लष्करी हेडकाॅर्टर पासून तर साहिवाल ते सिंधपर्यंत असलेल्या पाकी सैनिकांना 24 तास सर्जिकल स्ट्राइकमुळे कापरे भरत आहे.

भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला 1 हजार 546 दिवस उलटलेत. पण या सर्जिकल स्ट्राईकची दहशत अजूनही पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या मनात तेवढीच आहे जेवढी पहिल्या दिवशी होती.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्यातून ते वारंवार जाणवतं. आंतरराष्ट्रीय समुदायासमोर स्पष्ट करतो की भारत पाकिस्तानविरोधात बोगस सर्जिकल स्ट्राईक करत असेल तर पाकिस्तानही शांत बसणार नाही. भारताला प्रत्येक आघाडीवर आम्ही प्रत्युत्तर देऊ अशी दर्पोक्ती इम्रान खान यांनी ट्विटरवर केली आहे. भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करेल अशी भीती वारंवार पाकिस्तानी नेते बोलून दाखवतायत. त्यांच्या वक्तव्यातून वारंवार ही भीती जाणवते आहे. भारतानं दोनदा सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला आणि कुरापतखोर चीनलाही इशारा दिला आहे. पुन्हा भारताच्या वाट्याला जाल तर तुम्हाला सडेतोड उत्तर मिळेल, हा संदेश पाकिस्तान आणि चीनपर्यंत पोहचला आहे.