जो हमे छेडेगा, हम उसे छोडेंगे नही, राजनाथ सिंगांचा चीनचा इशारा

सर्व देशांसोबत शांततापूर्ण संबंध असावेत, अशी भारताची भूमिका आहे. आमचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. आम्ही कुणाचीही छेड काढणार नाही. पण आमची कुणी छेड काढली, तर आम्ही कुणालाही सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिलाय. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘जो हमे छेडेगा, हम उसे नही छोडेंगे’ असा इशारा दिलाय.

भारत हा शांतताप्रिय देश आहे. मात्र आमच्या शांततेचा अर्थ हा कमजोरी होत नाही. आमच्या संयमालादेखील मर्यादा आहेत. आमच्या संयमाचा अंत बघू नका, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीन आणि पाकिस्तानला दिलाय.

सर्व देशांसोबत शांततापूर्ण संबंध असावेत, अशी भारताची भूमिका आहे. आमचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. आम्ही कुणाचीही छेड काढणार नाही. पण आमची कुणी छेड काढली, तर आम्ही कुणालाही सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिलाय. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘जो हमे छेडेगा, हम उसे नही छोडेंगे’ असा इशारा दिलाय.

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना नक्षलवादी आणि खलिस्तानी म्हणणं योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. कुणीही शेतकऱ्यांवर असा आरोप कऱणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. शेतकरी हा अन्नदाता असून आपल्याला देशातील सर्व शेतकऱ्यांचा अभिमान असल्याचं राजनाथ सिंग यांनी म्हटलंय.

शेतकऱ्यांचं आंदोलन हा भारताचा अंतर्गत विषय असून त्यावर इतर देशांच्या पंतप्रधानांनी भारताला सल्ला देण्याची गरज नसल्याचं विधान त्यांनी केलंय.

चीनने सीमाभागात अनेक विकासकामे केली असून आपणदेखील त्या भागात विकासकामे करत असल्याचं संरक्षणमंत्र्यांनी म्हटलंय. मात्र ही कामे तिथल्या सैनिकांच्या सोयीसाठी आणि स्थानिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.