दिल्लीच्या पर्यावरण मंत्र्यांचे मोठे विधान, प्रदूषणासाठी भाजपला धरले जबाबदार

दिल्ली(Delhi) राज्य सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय(Gopal Rai) यांनी या प्रदूषणाला भाजप (BJP Responsible For Air Pollution)जबाबदार असल्याची टीका केली आहे.

    दिवाळीच्या दोन दिवसात राजधानी दिल्ली(Pollution In Delhi) आणि परिसरात (NCR)मध्ये हवेच्या प्रदूषणाने कहर केला आहे. हवेच्या गुणवत्तेची पातळी (Air Quality Poor In delhi) घसरली आहे.सगळीकडे धूरकट वातावरण होते.

    दिल्ली(Delhi) राज्य सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय(Gopal Rai) यांनी या प्रदूषणाला भाजप जबाबदार असल्याची टीका केली आहे. राय म्हणाले, “सर्वसामान्य लोकांनी अनेक ठिकाणी फटाके लावले नाहीत. याबाबत आम्ही मोहिम राबवली होती. मात्र काही ठिकाणी हे झालं नाही. भाजपच्या लोकांनी(Bjp Responsible For Air Pollution Rise In Delhi) जाणुनबूजुन फटाके लावले. यामुळे रात्री अचानक प्रदूषणाचा स्तर वाढला.

    प्रदूषणाचा स्तर वाढण्यामागे आणखी एक कारण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  दिल्ली जवळच्या पंजाब-हरियाणामध्ये शेतीची कामे लांबली आहेत. पीक काढून झाल्यावर पुढील पीक घेण्याआधी जमिनीत उरलेली पराळी ही जाळली जाते. सध्या ही कामे जोरात सुरु असल्याने निर्माण झालेला धूर हा राजधानी दिल्लीच्या वातावरणात पसरला आहे. यामुळे प्रदूषण वाढलं असल्याचं पर्यावरण मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

    असं असलं तरी सध्या दिल्लीच्या वातावरणात असलेला प्रदूषणाचा स्तर हा गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत जरा कमी असल्याची माहिती दिल्ली राज्य सरकारने दिली आहे. ही समाधानकारक गोष्ट असली तरी हवेची घसरलेली गुणवत्ता हा दिल्लीकरांच्या आरोग्यासाठी घातकच आहे.