
200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी सुकेश चंद्रशेखर प्रकरणाचा तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर बॉलिवूडचे आणखी दोन कलावंत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लवकरच त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. या दोघांनाही सुकेश याने महागडे गिफ्ट दिले होते, अशी माहिती समजते(Delhi money laundering case; Two Bollywood actors on ED's target).
दिल्ली : 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी सुकेश चंद्रशेखर प्रकरणाचा तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर बॉलिवूडचे आणखी दोन कलावंत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लवकरच त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. या दोघांनाही सुकेश याने महागडे गिफ्ट दिले होते, अशी माहिती समजते(Delhi money laundering case; Two Bollywood actors on ED’s target).
चंद्रशेखर याच्याकडून या दोघांनाही एका व्यापाऱ्याच्या पत्नीकडून खंडणी वसुली केल्यानंतर त्या पैशांतून महागडे गिफ्ट दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ईडी चौकशीच्या फेऱ्यात हे दोघेही कलावंत अडकण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ईडी चौकशी होण्याची शक्यता असली तरी, अद्याप या दोघांची नावे उघड झालेली नाहीत. या प्रकरणाच्या तपासावेळी चौकशीतून या दोघांची नावे वगळण्यात आली होती, असे समजते. यापूर्वी या प्रकरणात बॉलिवूडच्या दोन प्रसिद्ध अभिनेत्रींची चौकशी झाली आहे.
ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आल्यानंतर या दोन्ही अभिनेत्री चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहिल्या होत्या. या दोघींचीही सुकेश चंद्रशेखर याच्यासमोरच चौकशी करण्यात आली होती, असे सांगितले जात आहे.