दिल्ली महापालिका निवडणूक; ‘आप’च्या ट्रान्सजेंडर उमेदवाराकडून काँग्रेस उमेदवाराचा पराभव

राज्य निवडणूक आयोगाने बॉबी किन्नर यांच्या विजयाला दुजोरा दिला आहे. बॉबी किन्नर यांनी काँग्रेस उमेदवार वरुण ढाका यांचा ६७१४ मतांनी पराभव केला. यापूर्वी बॉबी म्हणाल्या होत्या, दिल्ली महापालिकेतून भ्रष्टाचार दूर करण्यासाठी मी काम करणार आहे. याशिवाय, माझा प्रभाग स्वच्छ, सुंदर कसा करता येईल यावर मी भर देणार आहे.

    नवी दिल्ली – दिल्ली महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आम आदमी पार्टी (AAP) आणि भाजप (BJP) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाच्या ट्रान्सजेंडर (Transgender) उमेदवार बॉबी किन्नर (Boby Kinnar) सुलतानपुरी ए वॉर्ड-४३ मधून विजयी झाल्या आहेत. पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर समुदायाचा सदस्य एखाद्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

    राज्य निवडणूक आयोगाने बॉबी किन्नर यांच्या विजयाला दुजोरा दिला आहे. बॉबी किन्नर यांनी काँग्रेस (Congress) उमेदवार वरुण ढाका यांचा ६७१४ मतांनी पराभव केला. यापूर्वी बॉबी म्हणाल्या होत्या, दिल्ली महापालिकेतून भ्रष्टाचार दूर करण्यासाठी मी काम करणार आहे. याशिवाय, माझा प्रभाग स्वच्छ, सुंदर कसा करता येईल यावर मी भर देणार आहे.

    ३८ वर्षीय बॉबी किन्नर यांना आम आदमी पक्षाने सुलतानपुरी माजरा विधानसभा मतदारसंघातून सुलतानपुरी-ए प्रभाग-४३ मधून तिकीट दिले आहे. अण्णांच्या आंदोलनापासूनच बॉबी किन्नर आप नेत्यांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी पक्षासाठी खूप काम केले. बॉबी ह्या समाजसेवेचे देखील काम करत असतात.