mumbai Actress accused of raping director

दिल्ली : न्यूड फोटोच्या सहाय्याने १०० महिलांची फसवणूक करणाऱ्या एक भामट्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली.

२६ वर्षीय आरोपीविरोधात दिल्लीमधील एका महिलेने तक्रार दाखल केली होती. सुमित झा असं या आरोपीचं नाव आहे.

सुमीत महिलांशी ओळख करुन त्यांना आपल्या जाळ्यात अडकवायचा. यानंतर महिलांकडे गुप्तांगाचे फोटो पाठवण्याची मागणी करायचा. यानंतर हे फोटो वापरुनच तो महिलांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. अशा प्रकारे सुमारे १०० महिलांना त्याने गंडा घातला होता.

दिल्लीतील या तक्रारदार महिलेला देखील त्याने अशाच प्रकारे आपल्या जाळ्यात ओढले होते. “आरोपीने माझं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केलं होतं. जर माझी पैशांची मागणी पूर्ण केली नाही तर न्यूड फोटो पोस्ट करेन अशी धमकी त्याने दिली होती. इतकंच नाही तर माझ्या संपर्क यादीतील मित्रांकडेही पैसे मागितले असल्याचे या महिले आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

या आधीही आरोपीला छत्तीसगडमध्ये अशाच एका प्रकरणात अटक झाली होती. त्याने आपला गुन्हा कबूल केला असल्याचे पोलिसांनी सांगीतले.