देशाच्या आरोग्यमंत्र्यांचा दिलासा आणि इशारा, कोरोनाचा अवघड काळ संपला मात्र…

डॉ. हर्ष वर्धन यांच्या म्हणण्यानुसार, देशात दररोज वीस हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यापैकी ९५.५३ टक्के रुग्ण बरे होत आहेत. रुग्ण बरे होण्याचं हे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. रशिया, ब्राझील, अमेरिका यासारख्या देशांमध्ये रुग्ण बरे होण्याचं प्रमाण भारताच्या तुलनेत कमी आहे. तिथे हे प्रमाण ६० ते ७० टक्के आहे.

गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोरोनानं संपूर्ण देशभर थैमान घातलं. आता कोरोनाचा जोर ओसरत आहे. पुढील महिन्यापासून लसीकरणाला प्रत्यक्षात सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळं कोरोनाचा अवघड काळ संपला आहे. मात्र तरीही कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. त्यामुळे सर्वांनी सतर्कता बाळगणं गरजेचं असल्याचं मत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी व्यक्त केलंय.

डॉ. हर्ष वर्धन यांच्या म्हणण्यानुसार, देशात दररोज वीस हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यापैकी ९५.५३ टक्के रुग्ण बरे होत आहेत. रुग्ण बरे होण्याचं हे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. रशिया, ब्राझील, अमेरिका यासारख्या देशांमध्ये रुग्ण बरे होण्याचं प्रमाण भारताच्या तुलनेत कमी आहे. तिथे हे प्रमाण ६० ते ७० टक्के आहे.

लसीकरण होऊन कोरोना पूर्णतः हद्दपार होईपर्यंत मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे उपाय करत राहणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. जानेवारी महिन्यात कुठल्याही आठवड्यात लसीकरण सुरू होऊ शकतं. त्याची नेमकी तारीख अद्याप निश्चित नसली, तरी जानेवारी महिन्यात शक्य तितक्या लवकरच ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी केंद्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. रुग्णांना देण्यात येणारी लस ही आरोग्यपूर्ण, परिणामकारक आणि सुरक्षित असावी, याची चाचपणी भारत सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत आहे. मात्र केंद्र सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं सर्वांनी पालन करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.