Direct Pakistan to rock the ball trending; What has Sneha Dubey got to do with Pune?

स्नेहा दुबे 2012 च्या बॅचच्या IFS अधिकारी आहेत. त्यांचे शालेय शिक्षणदेखील गोव्यातच झाले आहे. यानंतर, त्यांनी आपले उच्च शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून आणि नंतर जेएनयू दिल्ली येथून एमफिल पूर्ण केले.

    दिल्ली : संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भारताविरोधात गरळ ओकणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भारताच्या पहिल्या महिला सचिव स्नेहा दुबे यांनी अवैध पद्धतीने हस्तक केलेला पाकव्याप्त काश्मिरचा भारत तत्काळ रिकामा करा, अशा शब्दात खडसावत इम्रान खान यांची बोलतीच बंद केली. त्‍यांनी भारताची संयुक्‍त राष्‍ट्र आमसभेत भारताची वस्‍तुनिष्‍ठ भूमिका मांडलीच त्‍याचबरोबर पाकिस्‍तानचा दुटप्‍पीपणाही जगासमोर मांडला. दुबे यांनी केलेल्या पलटवाराचे कौतुक होत आहे. (India’s Sneha Dubey trends online for powerful response to Pakistan at UN)

    कोण आहेत स्नेहा दुबे?

    स्नेहा दुबे 2012 च्या बॅचच्या IFS अधिकारी आहेत. त्यांचे शालेय शिक्षणदेखील गोव्यातच झाले आहे. यानंतर, त्यांनी आपले उच्च शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून आणि नंतर जेएनयू दिल्ली येथून एमफिल पूर्ण केले.

    स्नेहाने 2011 मध्ये पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती परराष्ट्र मंत्रालयात झाली. नंतर 2014 मध्ये त्यांना माद्रिद येथील भारतीय दूतावासात पाठवण्यात आले. सध्या ती संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या पहिल्या सचिव आहेत.