‘उगाच मला डिवचू नका, मी एका मताने व्हीपी सरकार पाडलं होत’ सुब्रमण्यम स्वामी यांचा भाजपाला इशारा

खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्वीटला उत्तर देताना बग्गा यांनी लिहिले, 'ऐकले की तुम्ही जेम्स बाँडचे काका आहात का? ट्विट करण्याऐवजी मंदिर मार्ग एसएचओला फोन करा आणि तपशीलांसह खुलासा करा. मी तुम्हाला 48 तास देतो, त्यानंतर माझी पाळी आहे. तुमची वेळ आतापासून सुरू होते.' असं म्हटलं आहे.

    भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना भाजपच्या युवा मोर्चाचे नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे. दोन्ही नेते भाजपशी संबंधित आहेत परंतु आजकाल या दोन्ही नेत्यांमध्ये ट्वीटर वॉर रंगलं आहे.

    माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी तेजिंदर बग्गा यांच्यावर निशाणा साधत ट्विट केले होते, दिल्लीच्या पत्रकारांनी सांगितले की भाजपमध्ये सामील होण्यापूर्वी तेजिंदर बग्गा यांना किरकोळ गुन्ह्यांसाठी नवी दिल्लीतील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही विचारले आणि लिहिले की जर हे खरे असेल तर नड्डा यांना हे माहित असले पाहिजे.

    “मी एका मताने व्हीपी सरकार पडलं होत. उगाच मला डिवचू नका”, असं स्वामी यांनी बजावलं आहे. झालं असं की, भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी एक फोटो शेअर केला. यावेळी बग्गा यांनी सुब्रमण्यम स्वामींवर विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप केला. परंतु, नंतर तो फोटो बनावट असल्याचं समोर आलं. या खुलाशानंतर आता सुब्रमण्यम स्वामी यांनी बग्गा यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. इथपासून या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू झालेला हा वाद काही शमण्याचं नाव घेत नाही. कारण, आता हे शाब्दिक युद्ध थेट सरकार पाडण्यापर्यंत जाऊन पोहोचलं आहे.

    स्वामींच्या थेट हल्ल्याने भडकलेल्या बग्गा यांनीही याच ट्विटला उत्तर देताना स्वामींवर निशाणा साधला. बग्गा यांनी लिहिले, ऐकले की तुम्ही जेम्स बाँडचे काका आहात का? ट्विट करण्याऐवजी मंदिर मार्ग एसएचओला फोन करा आणि तपशीलांसह खुलासा करा. मी तुम्हाला 48 तास देतो, त्यानंतर माझी पाळी आहे. तुमची वेळ आतापासून सुरू होते. असं म्हटलं आहे.