मुलांना लस मिळाल्याशिवाय शाळासुरु करू नका- डॉ. रणदीप गुलेरिया

कोव्हॅक्सिन आणि झायडस कॅडिलाच्या लसीच्या चाचण्याही मुलांवर चालू आहेत. झायडसला परवानगी मिळाल्यानंतर मुलांना ती लस देण्याबाबत निर्णय घेतला जाईल- डॉ. व्ही. के. पॉल, नीती आयोगाचे आरोग्य सदस्य

    मुंबई: देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. आता कुठे दुसऱ्या लाटेचा वेगमंदावला असतानाच वैद्यकीय तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. या लाटेचा फटका लहान मुलांना बसू नये यासाठी प्रशासनाकडून योग्यती खबरदारी घेण्याचे काम सुरु आहे. कोरोनाच्या संसर्गाचा मुलांना होऊ नये यासाठी मार्च २०२०पासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण मुलांना शाळा सुरू करून पुन्हा बाहेरचं जग खुले करायचं असतील तर मुलांना लस देणे हाच एक पर्याय आहे, असे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

    २ ते १८ वयोगटातील मुलांवर सप्टेंबरमध्ये कोव्हॅक्सिन लसीचं जे प्रयोग करण्यात आले, त्याचे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांचे निष्कर्ष हाती येतील. औषध नियंत्रकांनी मंजुरी दिल्यानंतर मुलांना लस उपलब्ध होईल. ‘मुलांसाठी फायझर आणि झायडस लसींचे पर्याय असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. शाळा सुरू करण्याआधी मुलांना लसीकरण बंधनकारक आहे असं देखील सांगण्यात येत आहे.

    १२ते १८ वयोगटातील मुलांची संख्या १३ ते १४ कोटी आहे. त्यामुळे २५ ते २६ कोटी लसमात्रा लागतील. कोव्हॅक्सिन आणि झायडस कॅडिलाच्या लसीच्या चाचण्याही मुलांवर चालू आहेत. झायडसला परवानगी मिळाल्यानंतर मुलांना ती लस देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. असं स्पष्टीकरण नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिलं आहे.