Income Tax Return

सामान्य लोकांना, नोकरदारांना आयकर भरण्यास १२ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. म्हणजेच या वर्गाला १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  तर, ज्यांच्या खात्यांचे ऑडिट झालेले नाही त्यांना व त्यांच्या पार्टनरसाठी २०२०-२१ चा आयकर भरण्यासाठी १५ फेब्रुवारीची नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. जीएसटी भरण्यासही २८ फेब्रुवारीपर्यंची मुदतवाढ देण्यात आली आहे.

दिल्ली : आयकर भरणा, जीएसटी रिटर्न भरण्यासह प्रलंबित टॅक्स भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. मात्र, यात मुदतवाढ करण्यात आली आहे. यामुळे नोकरदार आणि व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थमंत्रालयाने परिपत्रकाद्वारे मुदतवाढीची घोषणा केली.

मुदत संपत आल्याने आयकर परतावा भरण्यासाठी अनेकांची घाई झाली. त्यातच सर्व्हरवर तांत्रिक अडचणी आल्याने अनेकांना कर भरता आला नाही. यामुळे आयकर भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. यावर केंद्र सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे.

सामान्य लोकांना, नोकरदारांना आयकर भरण्यास १२ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. म्हणजेच या वर्गाला १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  तर, ज्यांच्या खात्यांचे ऑडिट झालेले नाही त्यांना व त्यांच्या पार्टनरसाठी २०२०-२१ चा आयकर भरण्यासाठी १५ फेब्रुवारीची नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. जीएसटी भरण्यासही २८ फेब्रुवारीपर्यंची मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन बंद असल्यामुळे बहुतांशी चार्टर्ड अकाऊंटेंट यांच्याकडे खाते तयार करणे आणि ऑडिट करण्यासाठी पर्याप्त स्टाफ नाही. ते क्लाईंटकडे जाऊ शकत नाही ना क्लाईंट त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. अशावेळी छोटे सीए, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगी (एमएसएमई) आणि व्यापाऱ्यांना रिटर्न भरण्याची चिंता सतावत आहे. त्यामुळे रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आणखी वाढवण्याची मागणी करण्यात येत हेाती.