जीवनावश्यक वस्तू (दुरुस्ती) अधिनियम लागू करा; ससंदीय समितीची मागणी

देशात अधिकांश कृषी वस्तू वस्तू अधिशेष वाढला असला तीर शेतकऱ्यांच शित साठवणूक, गोदाम तसेच निर्यातीत घट झाल्यामुळे त्यांच्या उत्पादनांना योग्य ती किंमत मिळू शकली नसल्याचे समितीने म्हटले आहे.

    दिल्ली: संसदेच्या एका समितीने जीवनावश्यक वस्तू अधिनियम लागू करण्याची मागणी केली आहे. हा अधिनियम त्या तीन कायद्यांपैकी एक आहे ज्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर गेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहे. या समितीमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व आपसह सर्वच विरोधी पक्षाच्या सदस्यांचा समावेश आहे. सुदीप बंदोपाध्याय यांच्या नेतृत्वातील खाद्यसंबंधी स्थायी समितीने हा अधिनियम लागू करण्याची मागणी केली आहे. देशात अधिकांश कृषी वस्तू वस्तू अधिशेष वाढला असला तीर शेतकऱ्यांच शित साठवणूक, गोदाम तसेच निर्यातीत घट झाल्यामुळे त्यांच्या उत्पादनांना योग्य ती किंमत मिळू शकली नसल्याचे समितीने म्हटले आहे.