Finally Sonia Gandhi took to heart; In the presence of Rahul and Priyak, internal disputes within the Congress will be resolved through discussions with the leaders

दिल्ली : काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद सोडण्यासाठी शेवटी आता सोनिया गांधीनी पुढाकार घेतला आहे. सोनिया एका आठवड्यासाठी अनेक कॉंग्रेस नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. शनिवार पासून या भेटीला सुरुवात झाली आहे. राहुल आणि प्रियकांच्या उपस्थितीत त्या काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत. नेत्यांच्या तक्रारी व्यतिरिक्त पक्षाच्या पुढील रणनीतीवरही या बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याचे समजते.
पक्षाच्या नेत्यांनुसार या बैठकीत राज्य आणि केंद्रस्तरीय नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. पक्षातील सुधारणांविषयी बोलणाऱ्या नेत्यांसह सोनिया चर्चा करणार आहेत.

या बैठकीत राज्यातील पक्षीय अध्यक्षांच्या नेमणुका, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवरही चर्चा होऊ शकते.

माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि अंबिका सोनी आदी नेते शनिवारी बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी जनपथवर पोहोचले.

काँग्रेस नेत्यांमधील नाराजीची कारणे

फाईव्ह स्टार संस्कृतीने निवडणुका जिंकता येत नाहीत. असे म्हणत गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तिकीट मिळाल्यास ते प्रथम ५ स्टार हॉटेल बुक करतात. जर रस्ता खराब असेल तर ते त्यावर जात नाहीत. ही हायफाय संस्कृती सोडल्याशिवाय कोणतीही निवडणूक जिंकता येणार नाही असेही ते म्हणाले. मागील दोन कार्यकाळात काँग्रेसने लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदही सांभाळलेले नाही असेही त्यांनी म्हंटले होते.  काही महिन्यांपूर्वी पक्षाच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना विषयावर पत्र लिहिले होते. पक्षात वरून खालपर्यंत बदल करण्याची मागणी या पत्राद्वारे त्यांनी केली होती.