Find out why the increased speed of the Capital Express, at the urging of the army

मिळालेल्या माहितीनुसार, रांची रेल्वे विभागाने सैन्याच्या पुढाकाराने एक चांगले पाऊल उचलले. वास्तविक रामगडमधील सैन्याच्या १०० जवानांना राजधानी रेल्वेने दिल्लीला जावे लागले. त्याच्यासाठी रांची ते रामगड हे अंतर अधिक होते आणि तांत्रिक कारणांमुळे रांचीला जाणे अवघड होते.

दिल्ली : कोरोना काळात भारतीय रेल्वेने एक-एक विक्रम केले आहेत. एवढेच नव्हे तर त्याचे अनेक पैलूही पाहिले गेले आहेत. अशाच एका कारणास्तव नुकत्याच रेल्वेने सैन्याच्या (army ) आवाहनावर राजधानी एक्स्प्रेसचा ( rajdhani Express) वेग सुसाट वाढवला कारण सैन्यातील जवानांना रेल्वेत चढण्यासाठी पुरेसा वेळ मिळु शकेल.

मिळालेल्या माहितीनुसार, रांची रेल्वे विभागाने सैन्याच्या पुढाकाराने एक चांगले पाऊल उचलले. वास्तविक रामगडमधील सैन्याच्या १०० जवानांना राजधानी रेल्वेने दिल्लीला जावे लागले. त्याच्यासाठी रांची ते रामगड हे अंतर अधिक होते आणि तांत्रिक कारणांमुळे रांचीला जाणे अवघड होते. त्यांना जवळच्या बरकाकाना स्थानकावरून चढणे सोपे होते. परंतु समस्या अशी होती की या स्टेशनवर राजधानीचे स्टॉपपेज फक्त ५ मिनिटे होते. एवढ्या कमी वेळात १०० सैनिकांचे सामान चढवणे शक्य नव्हते. सैन्याने रेल्वेकडून जादा कालावधी मागितला परंतु असे करणे शक्य झाले नाही.

अशा परिस्थितीत रांची ते बरकाना येथे रेल्वे गाडी त्वरित पोहोचण्यासाठी रांची रेल्वे विभागाने रणनीती आखली. सायंकाळी ७.०८ वाजता ही गाडी बरकाकानाला पोहचली. परंतु ही ट्रेन पोहचण्यासाठी निर्धारित वेळ संध्याकाळी ७.२५ वाजता होती. अशा प्रकारे ट्रेन १७ मिनिटांपूर्वी पोहोचली. यामुळे जवानांना ५ मिनिटांचा स्टॉपपेज वेळही मिळाला. म्हणजेच जवानांना एकूण २२ मिनिटे मिळाली. ड्रायव्हरला मदत करण्यासाठी लोको इन्स्पेक्टरही ट्रेनमध्ये उपस्थित होता. ही ट्रेन ११० किमी प्रतितास वेगाने धावत होती आणि त्यापूर्वी त्याने ९० किमी १७ मिनिटांचा प्रवास केला होता.