दिल्लीत सीबीआय इमारतीच्या तळघराला आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल

इमारतीतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाल यश आलं आहे.

    नवी दिल्ली: दिल्लीतील लोधी रोड परिसरातील सीजीओ संकुलातील सीबीआय इमारतीच्या तळघराला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज(शुक्रवार) दुपारच्या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाल यश आलं आहे.


    आज दुपारी १. ४० वाजता सीबीआय कार्यालयाला आग लागली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहचल्या. या आगीत सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाहीये. सीबीआय इमारतीतील सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.