For the first time in the country, the population of women increased more than that of men; 1,020 females per 1,000 males

देशात प्रथमच पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या वाढली आहे. आता दर 1,000 पुरुषांमागे 1,020 महिला आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या 1000 च्या वर पोहोचण्याची स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 (एनएफएचएस-5) मध्ये ही आकडेवारी समोर आली(For the first time in the country, the population of women increased more than that of men; 1,020 females per 1,000 males).

    दिल्ली : देशात प्रथमच पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या वाढली आहे. आता दर 1,000 पुरुषांमागे 1,020 महिला आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या 1000 च्या वर पोहोचण्याची स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 (एनएफएचएस-5) मध्ये ही आकडेवारी समोर आली(For the first time in the country, the population of women increased more than that of men; 1,020 females per 1,000 males).

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली. यापूर्वी 2015-16 मध्ये आयोजित केलेल्या एनएफएचएस-4 मध्ये ही संख्या दर 1,000 पुरुषांमागे 991 महिला होती. या आकडेवारीवरुन भारतात आता महिलांची संख्या सातत्यानं वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.प्रजनन दरातही घट

    जनन दर म्हणजे, लोकसंख्येच्या वाढीचा दर. सर्वेक्षणानुसार देशातील प्रजनन दर 2 वर आला असून 2015-16 मध्ये ते 2.2 होते.  15 वर्षाहून कमी वय असलेली जनसंख्या जो 2005-06 मध्ये 35.6 टक्के होता. 2019-21 मध्ये घट होत 26.5 झाला आहे.

    एका महिलेद्वारे आपल्या आयुष्यात मुलाला जन्म देण्याची एकूण संख्य 2.2 वरुन 2 झाली आहे, तर गर्भनिरोधक प्रसार दर 54% वरून 67% पर्यंत वाढला आहे.

    20 ते 24 वर्षाच्या 23.3% महिला अशा आहेत ज्यांचा विवाह 18 वर्षापूर्वीच झाला. 18 ते 49 वयोगटातील 29.3% महिलांनी आयुष्यात छळ भोगला तर 18 ते 49 वयोगटातील 3.1% महिलांनी गर्भावस्थेत शारीरिक हिंसाचार सोसला.