For the next 40 days, the weather in the state will be more or less cold nrsj

हिमालयात होणाऱ्या हिमवृष्टीमुळे देशात शीतलहरी कमी-जास्त प्रमाणात वाहणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातही थंडीचा कडाका जाणवणार आहे. पुढील काही दिवसांत थंडी वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कमी-जास्त प्रमाणात राहणार आहे.

दिल्ली : हिवाळ्याचा हंगाम सुरु असून वातावरणातील (weather ) सतत होणाऱ्या बदलांमुळे थंडीचा पाऱ्यात चढ-उतार होताना दिसत आहे. राज्यात काही भागांत कडाक्याची थंडी (cold)

पडली आहे. अनेक ठिकाणी पारा उने अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहे. हिमालयात पुढील ४० दिवस म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापर्यंत हिमवृष्टी सुरु राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे देशात थंडीचा हंगाम हा कडाक्याचा असणार आहे.

हिमालयात होणाऱ्या हिमवृष्टीमुळे देशात शीतलहरी कमी-जास्त प्रमाणात वाहणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातही थंडीचा कडाका जाणवणार आहे. पुढील काही दिवसांत थंडी वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कमी-जास्त प्रमाणात राहणार आहे. यंदा अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात आलेल्या वादळांनी हिवाळा लांबला. नोव्हेंबर व अर्ध्या डिसेंबर महिन्यात थंडी जाणवलीच नाही.

डिसेंबरच्या मध्यापासून महाराष्ट्रात यंदा थंडी पडू लागली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा कडाका आणखी वाढणार आहे. दक्षिण भारतातील उत्तर पूर्व मान्सून संपणार आहे. यंदाच्या हंगामात तामिळनाडूत १० टक्के अधिक पर्जन्यमान झाले. त्यामुळे या भागातही थंडी वाढणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वातावरणात पुन्हा मोठे बदल होत असून, उत्तर भारतात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात थंडीचा पारा वाढणार

२५ ते ३१ डिसेंबरदरम्यान मध्य भारतावर वार्‍यांची चक्रिय स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे किमान तापमान २ ते ४ अंशांनी कमी होईल. जानेवारीत थंडीचा कडका कमी होतो. मात्र, यंदा संपूर्ण जानेवारी महिन्यात थंडी जाणवेल. ती फेब्रुवारीअखेरपर्यंत राहील.

महाराष्ट्रातील थंडीची लाट ही उत्तर भारतातील शीतलहरींवर अवलंबून असते. यंदा फेब्रुवारीअखेरपर्यंत थंडी जाणवणार आहे. मात्र, ती सलग असणार नाही. उत्तर भारतात शीतलहरी उगम पावतात. त्या महाराष्ट्रात येईपर्यंत तीन-चार दिवस लागतात. त्यामुळे थोड्या-थोड्या विश्रांतीनंतर थंडीचा कडाका कमी-अधिक होत जाईल. असे हवामान तज्ञ अनुपम कश्यपि यांनी सांगितले आहे.

राज्यात विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी असल्याने बागायतदार शेतकरी मात्र चिंतेत दिसत आहेत. थंडीमुळे द्राक्षे बागायतादारांचे मोठे नुकसान होणार असल्याचे संकेत दिसत आहेत. द्राक्षांना तडे जात असल्याचे निदर्शनासही आले आहे. तर धुक्यामुळे अनेक ठिकाणी अपघाताचे प्रमाणही वाढत आहे.