पोलिस कोठडीतून पळालेल्या माजी आमदाराला अटक;२ वर्षांनी आवळल्या मुसक्या

शोकीन याला खंडणीखोरी आणि जबरी चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. न्यायालयाकडून शोकीन याने उपचारासाठी परवानगी घेतल्यानंतर त्याला २६ सप्टेंबर २०१८ रोजी सफदरजंग रुग्णालयात नेण्याची न्यायालयाने परवानगी दिली होती.

दिल्ली: पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या माजी आमदाराच्या २ वर्षांनी मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. रामबीर शोकीन असे या माजी आमदाराचं नाव आहे. शोकीन याला बागपत पोलिस अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. २०१६ साली शोकीन याला मकोका अंतर्गत अटक करण्यात आली होती. शोकीन हा कुख्यात गँगस्टर नीरज बवाना याचा काका आहे.

सफदरजंग रुग्णालयातून झाला होता पसार
शोकीन याला खंडणीखोरी आणि जबरी चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. न्यायालयाकडून शोकीन याने उपचारासाठी परवानगी घेतल्यानंतर त्याला २६ सप्टेंबर २०१८ रोजी सफदरजंग रुग्णालयात नेण्याची न्यायालयाने परवानगी दिली होती. रुग्णायात पोहोचल्यानंतर डॉक्टर शस्त्रक्रियेत व्यस्त असल्यामुळे पोलिसांना थांबावे लागले. याच परिस्थितीचा फायदा उचलत शोकीन रुग्णालयातून फरार झाला होता. शोकीन याला रुग्णालयातून पळवून नेण्यासाठी त्यांची बायको रितासिंग ही दोन मोठ्या गाड्या घेऊन तयार होती. रिता हिच्यासोबत शोकीन यांचे सहकारीही होते. शोकीन याने त्याला रुग्णालयात नेण्यासाठी आलेल्या पोलिसांना ‘माझ्या घरी जेवण करू, मला काही कागदपत्रेही घरून घ्यायची आहेत’ असे सांगितले होते. शोकीन यांच्या साथीदाराने पोलिसांना त्याच्या देवली येथील घरी नेण्यासाठी टॅक्सी मागवली होती. पोलिस जेव्हा शोकीन यांच्या घरी पोहोचले तेव्हा ते घरी आलेच नसल्याचे पोलिसांना कळाले. सतर्क झालेल्या पोलिसांनी शोकीन याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तो फरार झाला होता.