माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जींची राजकारणातून निवृत्ती

शर्मिष्ठा यांचे बंधू अभिजित मुखर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडून तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्ष सोडल्यानंतर शर्मिष्ठाबाबतही अटकळ बांधली जात होती, पण आता तिने राजकारण सोडण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

    माजी राष्ट्रपती Former President प्रणव मुखर्जी Pranab Mukherjee यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी Sharmishtha Mukherjee यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, त्या आता सामाजिक, कला आणि संस्कृतीशी संबंधित काम पुढे नेतील. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगीतलं की, मी राजकारण सोडतेय पण, काँग्रेसची सदस्य कायम राहणार आहे.

    ट्वीटरवर एका युजरने त्यांना ‘उत्तम राजकारणी’ म्हणलं होतं. यावर रिप्लाय देताना शर्मिष्ठा ‘खूप आभार परंतु, मी आता राजकारणी नाही. मी राजकारण सोडलंय. काँग्रेसची प्राथमिक सदस्य आहे आणि राहील. परंतु, आता सक्रीय राजकारणात परतणार नाही. इतर व्यक्तींप्रमाणे इतर मार्गांतून राष्ट्राची सेवा करत राहील’, असं शर्मिष्ठा यांनी या ट्विटला उत्तर देताना म्हटलंय.

    राजकारणाचे धडे गिरवणं हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता. मला काम करण्याची संधी देण्यासाठी मी पक्षाचे मनापासून आभार मानते. मी माझ्याकडून १०० टक्के देण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुळातच मी राजकारणी नाही याची मला जाणीव झाली. लोकशाही बहुलतावादी भारताची दृष्टी केवळ राजकारण नाही. आपण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं योगदान देऊ शकतो, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

    दरम्यान, शर्मिष्ठा यांचे बंधू अभिजित मुखर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडून तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्ष सोडल्यानंतर शर्मिष्ठाबाबतही अटकळ बांधली जात होती, पण आता तिने राजकारण सोडण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.