हे आहेत कोरोना काळात जनतेला मदत करणारे टॉप १० खासदार ! राहुल गांधी, नितीन गडकरी आणि….

दिल्लीतील सिटीझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्म या संस्थेनं हा सर्व्हे केला. यातील निष्कर्षानुसार मतदारसंघातील जनतेसाठी मदतगार ठरलेल्या टॉप १० नेत्यांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप खासदार तेजस्वी सूर्या, भाजप खासदार अनिल फिरोजिया यांच्या नावांचा समावेश आहे.

कोरोना संकटाच्या काळात कुठल्या नेत्यांनी सर्वसामान्य जनतेला मदत केली आणि कुठल्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघातील जनतेला खऱ्या अर्थानं मदतीचा हात दिला, याचं सर्वेक्षण नुकतंच करण्यात आलं. मतदारसंघातील जनतेशी संवाद साधून हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणाअंती देशातील टॉप १० अशा नेत्यांची नावं जाहीर करण्यात आलीयत, ज्यांनी प्रत्यक्ष मतदारसंघात चांगलं काम केलं.

दिल्लीतील सिटीझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्म या संस्थेनं हा सर्व्हे केला. यातील निष्कर्षानुसार मतदारसंघातील जनतेसाठी मदतगार ठरलेल्या टॉप १० नेत्यांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप खासदार तेजस्वी सूर्या, भाजप खासदार अनिल फिरोजिया यांच्या नावांचा समावेश आहे.

१ ऑक्टोबरपासून या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली होती. एकूण २५ खासदार आणि त्यांचे मतदारसंघ यांना या स्पर्धेसाठी निवडण्यात आलं होतं. सर्वसामान्य जनतेतून आलेल्या प्रतिसादाच्या आधारे या २५ जणांची निवड करण्यात आली होती.

या सर्वेक्षणात खासदारांचं वर्तन, त्यांनी केलेली मदत आणि नागरिकांसाठी दिलेला वेळ या गोष्टींचाच विचार करण्यात आला. मात्र कोरोनाचे नियम त्यांनी पाळले का, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं का, मास्क लावला होता का, यासारखे निकष विचारात घेतले नसल्याचं सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेनं स्पष्ट केलंय.

हे आहेत टॉप १० खासदार