
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेल शंभरीच्या पार गेल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेलला केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भारी ऑप्शन शोधला आहे. याबाबत केंद्र सरकार ८ ते १० दिवसांत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेल शंभरीच्या पार गेल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेलला केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भारी ऑप्शन शोधला आहे. याबाबत केंद्र सरकार ८ ते १० दिवसांत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
ऑटोमोबाइल क्षेत्रात फ्लेक्स-फ्ल्यूल इंजिन (Flex-fuel Engine) अनिवार्य करण्याच्या विचार सरकार करत असल्याची चर्चा आहे. गडकरी यांनी रोटरी संमेलन २०२०-२१ मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. यावेळी त्यांनी देशात फ्लेक्स-फ्ल्यूल इंजिन अनिवार्य करण्याचे संकेत दिले.
वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्यूएल इंजिन लावल्यास इंधन म्हणून इथेनॉलचा वापर करता येईल. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे. पर्यायी इंधन म्हणून इथेनॉचा वापर होवू शकतो. इथेनॉची किंमत ६० ते ६२ रुपये प्रतिलीटर इतकी आहे. देशात पेट्रोलचा दर १०० रुपये प्रतिलीटर इतका पोहोचला आहे. इथेनॉलच्या वापरामुळे वाहनचालकांचे प्रतिलीटर ३० ते ३५ रुपये वाचतील, असंही गडकरी म्हणाले.
या निर्णयामुळे देशाच पेट्रोल किंवा डिझेल इंजिनसह वाहनांमध्ये फ्लेक्स फ्ल्यूएल इंजीन असलेली वाहनेही उपलब्ध होणार आहेत. यामुळे इंधन म्हणून १०० टक्के कच्च्या तेलाचा वापर करता येऊ शकतो.
जगभरात सध्याच्या घडीला ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्स-फ्लूएल इंजिनाची निर्मिती केली जाते. त्यामुळे वाहनचालकांना १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के इथेनॉल वापरण्याचा पर्याय वाहनामध्ये उपलब्ध होतो, असंही गडकरींनी सांगितलं.