सराफ बाजारात सोन्याच्या किमती ५० हजारांच्या पार; चांदीच्या दरातही मोठी वाढ

देशातील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत आज वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज रोजी सोने दरात 496 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर 50 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. चांदीच्या किंमतीतही आज 2 हजार रुपयांहून अधिक भाव वाढ झाली आहे. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 49,801 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदी 67,228 रुपये प्रति किलोग्रॅम होती.

दिल्ली (Delhi).  देशातील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत आज वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज रोजी सोने दरात 496 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर 50 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. चांदीच्या किंमतीतही आज 2 हजार रुपयांहून अधिक भाव वाढ झाली आहे. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 49,801 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदी 67,228 रुपये प्रति किलोग्रॅम होती. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कोरोना व्हायरसबाबत चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याने, सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव 496 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला आहे. त्यामुळे दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा भाव 50.297 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. त्याशिवाय रुपया डॉलरच्या तुलनेत 17 पैशांनी घसरला असून 73.73 वर पोहचला आहे.

चांदीचा भाव
चांदीच्या दरातही सोमवारी वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज चांदीच्या दरात 2249 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा भाव 69,477 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Securities) सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या-चांदीच्या आंतरराष्ट्रीय किंमतीचा परिणाम भारतीय बाजारावर पडला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे (New Strain of Coronavirus) कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाल्याने, गुंतवणूकदारांमध्ये सुरक्षित गुंतवणूकीची चिंता वाढली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आज पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिलं आहे.