सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या काय आहे आजचा दर

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने ५७,००० च्या उच्चांकाची पातळी गाठली होती, परंतु त्यानंतर सोन्याचे दर १० ग्रॅम १२,००० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. या वेळी गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.

    दिल्ली: सोन्याच्या किंमतींमध्ये सलग चौथ्या घसरणीची नोंद झाली आहे, तर चांदीही आज स्वस्त झाली आहे. आजच्या एमसीएक्सवरील सोन्याचे वायदे ०. ४ टक्केने कमी होऊन ते ४४,५३८ प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाले. याखेरीज चांदी०. ३ टक्क्यांनी घसरून ६३,९८५ प्रती किलो झाली आहे. या वर्षाच्या सुरूवातीपासूनच भारतातील सोन्याच्या किंमती सुमारे पाच हजार रुपयांनी खाली आल्या आहेत. आपल्याला सोने खरेदी करायचे असल्यास, ही चांगली संधी आहे, कारण यावेळी सोने ११ महिन्यांच्या सर्वात खालच्या पातळीवर आले आहे.

    गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने ५७,००० च्या उच्चांकाची पातळी गाठली होती, परंतु त्यानंतर सोन्याचे दर १० ग्रॅम १२,००० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. या वेळी गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.

    नवीन सोन्याचे दर दिल्ली बुलियन मार्केटमध्ये शुक्रवारी सोन्याच्या किंमती ०. ४ टक्क्यांनी घसरल्या आणि राजधानी दिल्लीत सोन्याचे नवीन दर आता प्रति १० ग्रॅम ४४,५३८ रुपयांवर गेले आहेत. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ०. ४ टक्के घसरून१,७०४,९० डॉलर प्रति औंस झाला.  चांदीच्या किंमतींमध्येही आज घट नोंदवली गेली आहे. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये या मौल्यवान धातूची किंमत ०.३ टक्क्यांनी घसरून ६३,९८५ रुपये प्रति किलो झाली आहे.
    डॉलरची कमकुवतपणा, वाढती महागाईचा दबाव आणि चलनवाढीचा थेट परिणाम सोन्याच्या भावावर झाल्यामुळे सोन्याच्या किंमती कमी झाल्याचे मत तंज्ञान्यानी व्यक्त केले आहे.

      आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन महिन्यांत सोन्याची किंमत ४८. ००० रुपयांपर्यंत जाईल. त्याचबरोबर दोन महिन्यांत चांदी ७०ते ७२ हजारा रुपयांदरम्यान असेल. त्याचवेळी, सोन्याची वाढ खूप वेगवान होईल आणि ती ४५ ,५०० रुपयांची पातळी ओलांडेल आणि ४८ हजारापर्यंत पोहोचेल.