आपला छळ झाला, जबरदस्तीने ‘जय श्रीराम’ म्हणायला लावले, बेदम चोप दिला, ISIS च्या दहशतवाद्याची न्यायालयात तक्रार

तुरुंगातील अन्य कैद्यांनी आपल्याला जबरदस्तीनं 'जय श्रीराम' म्हणायला लावल्याचा आरोप राशिदनं केलाय. या प्रकरणी त्याने दिल्लीतील स्थानिक न्यायालयात तक्रार केली असल्याची माहिती आहे. राशिद जफर हा देशातील काही महत्त्वाच्या नेत्यांच्या हत्येची तयारी करत होता आणि उत्तरेतील काही महत्त्वाच्या सरकारी संस्थांमध्ये घातपात करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. राशिदवरचे हे आरोप ऐकून तुरुंगातील कैद्यांचादेखील संताप झाला आणि त्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

    भारतात साखळी बॉम्बस्फोट घडवणे, आत्मघातकी हल्ले करणे यासारख्या दहशतवादी कृत्यांसाठी अटकेत असलेला संशयित दहशतवादी राशिद अफसर याला पोलिसांनी अटक केलीय. राशिद हा आयसीस या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. २०१८ सालापासून राशिदला तिहार तुरुंगात ठेवण्यात आलंय.

    तुरुंगातील अन्य कैद्यांनी आपल्याला जबरदस्तीनं ‘जय श्रीराम’ म्हणायला लावल्याचा आरोप राशिदनं केलाय. या प्रकरणी त्याने दिल्लीतील स्थानिक न्यायालयात तक्रार केली असल्याची माहिती आहे. राशिद जफर हा देशातील काही महत्त्वाच्या नेत्यांच्या हत्येची तयारी करत होता आणि उत्तरेतील काही महत्त्वाच्या सरकारी संस्थांमध्ये घातपात करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. राशिदवरचे हे आरोप ऐकून तुरुंगातील कैद्यांचादेखील संताप झाला आणि त्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

    तिहार तुरुंगातील कैद्यांनी आपल्याला जबरदस्तीनं ‘जय श्रीराम’ म्हणायला लावलं आणि बेदम मारहाणही केली, असा आरोप राशिदनं केलाय. घातपाती कृत्यात सहभागी असल्याच्या आरोपामुळे संतापलेल्या कैद्यांनी आपली जोरदार धुलाई केल्याची माहिती आपण वडिलांना फोनवरून दिली होती, असंही राशिदनं म्हटलंय.