Rape of a six-year-old girl in Mumbai

राजधानी दिल्लीतील द्वारका भागात एका महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी आरोपी 17 वर्षीय मुलाला अटक केली आहे. आरोपीने महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केली आणि मग पुरावे मिटवण्यासाठी तिच्या गुप्तांगाला आग लावली (He raped and killed her and then set fire to her genitals to destroy the evidence Incidents in Delhi).नराधमाचा क्रुरपण पाहून पोलिसही हादरले आहेत.

    दिल्ली : राजधानी दिल्लीतील द्वारका भागात एका महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी आरोपी 17 वर्षीय मुलाला अटक केली आहे. आरोपीने महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केली आणि मग पुरावे मिटवण्यासाठी तिच्या गुप्तांगाला आग लावली (He raped and killed her and then set fire to her genitals to destroy the evidence Incidents in Delhi).नराधमाचा क्रुरपण पाहून पोलिसही हादरले आहेत.

    महिलेची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या मुलाने तिच्या प्रायव्हेट पार्टला आग लावल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सुमारे 2700 लोकांची चौकशी करण्यात आली असून अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, 15 नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांना नाल्याजवळ एका कचऱ्यात महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली होती.

    पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून घटनेचा तपास सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला खुनाच्या आरोपाखाली अटक केली. नंतर चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने महिलेवर बलात्कार केला. पकडले जाण्याच्या भीतीने त्याने तिचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या प्रायव्हेट पार्टला आग लावली. आता पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. बलात्काराची कलमेही जोडण्यात आली आहेत.