Hit China economically; 43% of Indians did not buy any Chinese goods

लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या संघर्षाला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. गलवानमध्ये भारतीय सैन्याने चीनच्या पीएलएला सडेतोड उत्तर दिले होते. दुसरीकडे आर्थिक पातळीवरही भारतीय लोकांनी चीनला धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. एका सर्व्हेनुसार, 43 टक्के भारतीयांनी गेल्या एक वर्षात चीननिर्मित एकही वस्तू खरेदी केलेली नाही. तसेच ज्यांनी चिनी वस्तू खरेदी केली आहे, त्यातील 60 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी 1 किंवा 2 वस्तूच खरेदी केल्या आहेत. कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकलसर्कलने याविषयीचा सर्व्हे केला.

    दिल्ली : लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या संघर्षाला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. गलवानमध्ये भारतीय सैन्याने चीनच्या पीएलएला सडेतोड उत्तर दिले होते. दुसरीकडे आर्थिक पातळीवरही भारतीय लोकांनी चीनला धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. एका सर्व्हेनुसार, 43 टक्के भारतीयांनी गेल्या एक वर्षात चीननिर्मित एकही वस्तू खरेदी केलेली नाही. तसेच ज्यांनी चिनी वस्तू खरेदी केली आहे, त्यातील 60 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी 1 किंवा 2 वस्तूच खरेदी केल्या आहेत. कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकलसर्कलने याविषयीचा सर्व्हे केला.

    18,000 लोकांचा समावेश

    या सर्व्हेत देशातील 281 जिल्ह्यांतील 18,000 लोकांचा समावेश करण्यात आला. सर्व्हेक्षणात सहभागी लोकांनी चिनी सामान खरेदी करण्यामागे कमी किंमत व पैशांची बचत ही कारणे सांगितली. काही लोक असेही आहे ज्यांच्या म्हणण्यानुसार चीननिर्मित उत्पादनांच्या क्वालिटीसाठी त्यांनी या वस्तूंची खरेदी केली.

    अनेक वस्तूंसाठी चीनवर अवलंबूनचिनी वस्तू खरेदी केलेल्यापैकी जवळपास 70 टक्के लोकांनी सांगितले की, किंमत योग्य वाटल्याने वस्तूची खरेदी केली. अनेकांनी चांगली क्वालिटी किंवा वेगळेपणामुळे वस्तू खरेदी केल्याचे सांगितले. 14 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी 12 महिन्याच्या काळात 3 ते 5 वस्तू खरेदी केल्या, तर 7 टक्के लोकांनी सांगितले की, 5 ते 10 वस्तू खरेदी केल्या आहेत. भारत हा अनेक वस्तूंसाठी चीनवर अवलंबून आहे. चीन भारताला इलेक्ट्रिकल मशिनरी, औषधे निर्यात करत असतो.

    स्वदेशीचा नारा

    चीनसोबतच्या संघर्षानंतर भारत सरकारने स्वदेशी वस्तूंच्या वापराला चालना दिली होती. शिवाय 100 पेक्षा अधिक चिनी ऍपवर बंदी आणली होती. यात टीकटॉक, एलीएक्सप्रेस, कॅम स्कॅनर, पब्जी, शेअर चॅट अशा ऍप्सचा समावेश होता. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारतामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते, चीनचे 42 सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. भारतीयांनी चिनी वस्तूवर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर मोदी सरकारने चीनविरोधात अनेक कठोर निर्णय घेतले होते.

    हे सुद्धा वाचा