गृहमंत्री अमित शाह यांनी बोलवली बैठक, मुख्यमंत्री ठाकरे दिल्लीत दाखल

गृहमंत्री अमित शहा या बैठकीचे अध्यक्ष असतील. या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिव आणि डीजीपी यांनाही बोलावण्यात आले आहे. या बैठकीचे फोकस सुरक्षा आणि विकासासारख्या मुद्द्यांवर आहे. यामध्ये केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, आयबीचे संचालक अरविंद कुमार आणि गृह मंत्रालयाचे सर्व उच्च अधिकारी सहभागी होतील. सीआरपीएफचे डीजी देखील या बैठकीला उपस्थित राहतील.

    केंद्रीय गृह मंत्रालयाने रविवारी (आज) नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. गृहमंत्री अमित शहा या मुख्यमंत्र्यांसह नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. ही बैठक दिल्लीतील विज्ञान भवनात होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या बैठकीसाठी दिल्लीतील विज्ञान भवनात पोहोचले असून बैठकीला सुरुवात झाली आहे.

    गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक हेसुद्धा बैठकीला उपस्थित असतील. बैठकीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत ही बैठक चालेल.

    नक्षलवादी चळवळ आता दुर्गम भागातून शहरांकडे वळत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी देशातील नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला जाण्यापूर्वी सोमवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत राज्यातील नक्षलवाद विषयक आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आता उद्धव ठाकरे राज्यातील नक्षलवादी कारवायांबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती देतील.

    दरम्यान, गृहमंत्री अमित शहा या बैठकीचे अध्यक्ष असतील. या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिव आणि डीजीपी यांनाही बोलावण्यात आले आहे. या बैठकीचे फोकस सुरक्षा आणि विकासासारख्या मुद्द्यांवर आहे. यामध्ये केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, आयबीचे संचालक अरविंद कुमार आणि गृह मंत्रालयाचे सर्व उच्च अधिकारी सहभागी होतील. सीआरपीएफचे डीजी देखील या बैठकीला उपस्थित राहतील.