पुढील आठवड्यात पाऊस कसा असेल? हवामान खात्याने वर्तवला अंदाज ; शेतीच्या अडचणी काही काळ वाढण्याची शक्यता

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात कमी पाऊस होईल. स्कायमेट या हवामान अभ्यास संस्थेच्या अहवालानुसार, २९ जूननंतर देशातील बहुतांश भागात मान्सूनचा जोर कमी होईल. पुढील ४-५ दिवस वातावरण कोरडं राहिल. असं असलं तरी काही ठिकाणी चांगला पाऊसही होईल. यात प्रामुख्याने पूर्वोत्तर भारत, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागाचा समावेश आहे. याशिवाय देशातील अधिकाधिक भागात पुढील आठवडाभर पावसाचं प्रमाण कमी असेल.

    नवी दिल्ली : पुढील काळही शेतकऱ्यांना काळजीत टाकणारा असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील आठवडाभर भारतात पावसाचं प्रमाण कमी असणार आहे. त्यामुळे खरीपातील पिकांना लागणाऱ्या पाण्याविना शेतीच्या अडचणी काही काळ वाढण्याची शक्यता आहे. असं असलं तरी विदर्भाच्या काही भागात, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप आणि छत्तीसगडमधील काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात कमी पाऊस होईल. स्कायमेट या हवामान अभ्यास संस्थेच्या अहवालानुसार, २९ जूननंतर देशातील बहुतांश भागात मान्सूनचा जोर कमी होईल. पुढील ४-५ दिवस वातावरण कोरडं राहिल. असं असलं तरी काही ठिकाणी चांगला पाऊसही होईल. यात प्रामुख्याने पूर्वोत्तर भारत, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागाचा समावेश आहे. याशिवाय देशातील अधिकाधिक भागात पुढील आठवडाभर पावसाचं प्रमाण कमी असेल.

    भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितलं, उत्तर भारताच्यावरील वातावरणाचा अंदाज घेतल्यानंतर राजस्‍थान, पश्चिम उत्‍तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, चंडीगड आणि दिल्‍लीत पुढील ६-७ दिवसापर्यंत दक्षिण-पश्चिम मान्सून पुढे सरकण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.