covishield vaccine

सध्या सर्वत्र वेगाने लसीकरण होत असले तरी दोन डोसमधील अंतर किती असाव याबाबत संशोधन आणि अभ्यास सुरू आहे. लस उत्पादन करणारी कंपनी ऑक्सफोर्डने अलीकडेच त्यांचा लशीबाबतचा संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे.

  दिल्ली : जगात सर्वत्र कोरोनाने थैमान घेतले आहे. यामुळे वेगाने लसीकरण हाच एक पर्याय अवलंबला जात आहे. मात्र, कोरोनाच्या दोन लशींमधील अंतर वाढल्याने नागरीक हैराण झाले आहेत. त्यातच आता कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर 12 आठवड्यांऐवजी 45 आठवडे केल्यास अथवा 10 महिन्याचं अंतर ठेवल्यास ही लस शरीरात अत्यंत प्रभावी काम करत असल्याचा दावा ऑक्सफोर्डने केला आहे.

  सध्या सर्वत्र वेगाने लसीकरण होत असले तरी दोन डोसमधील अंतर किती असाव याबाबत संशोधन आणि अभ्यास सुरू आहे. लस उत्पादन करणारी कंपनी ऑक्सफोर्डने अलीकडेच त्यांचा लशीबाबतचा संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे.

  दोन डोसमधील अंतर 12 आठवड्यांऐवजी 45 आठवडे केल्यास किंवा हा कालावधी 10 महिन्यांपर्यंत वाढवल्यास ही लस शरीरात अत्यंत प्रभावी काम करत असल्याचा दावा ऑक्सफोर्डने या संशोधनाद्वारे केला आहे. भारतात ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची कोविशील्ड(Covishield)  ही लस सीरम इन्स्टिट्यूटकडून निर्माण केली जात आहे.

  ऑक्सफोर्डच्या संशोधनातील दावे

  • 15 ते 55 वयोगटातील व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला.
  • एस्ट्राजेनेका लसीच्या पहिल्या डोसनंतर जवळपास एक वर्ष शरीरात अँन्टीबॉडी तयार होतात.  परंतु 28 दिवसानंतर शरीरातील अँन्टिबॉडीची जी पातळी होती ती 180 दिवसानंतर निम्म्यावर आली. तर दुसऱ्या डोसनंतर अँन्टिबॉडी पातळी एका महिन्यानंतर 4 ते 18 पटीने वाढली.
  • दुसऱ्या डोसनंतर 6 महिन्यांनी बूस्टर म्हणून तिसरा डोस दिला तर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटविरोधात शरीरात लसीचा अधिक प्रभावी आणि सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे ही या संधोधनात म्हटलं आहे.