हा कसला राग म्हणायचा?…म्हणून पोरनं थेट मास्तरच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड

राजधानी दिल्लीत शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शिक्षकाने वर्गात नीट बसण्यास सांगितल्याचा राग मनात धरून विद्यार्थ्याने वर्गातच लोखंडी रॉडने शिक्षकाचे डोके फोडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पश्चिम दिल्लीतील बापरोला गावात घडली आहे. पश्चिम दिल्लीच्या बापरोला गावातील शाळेत ही घटना घडली आहे.

    दिल्ली : राजधानी दिल्लीत शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शिक्षकाने वर्गात नीट बसण्यास सांगितल्याचा राग मनात धरून विद्यार्थ्याने वर्गातच लोखंडी रॉडने शिक्षकाचे डोके फोडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पश्चिम दिल्लीतील बापरोला गावात घडली आहे. पश्चिम दिल्लीच्या बापरोला गावातील शाळेत ही घटना घडली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शिक्षक विक्रांत हे बापरोला गावातील शाळेत शिकवतात. 18 सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास ललित नावाचा मुलगा वर्गात आला. तो आपल्या जागेवर नीट बसलेला नव्हता. विक्रांत यांनी ललितला वर्गात व्यवस्थित बसण्यास सांगितले. त्यानंतर ललितने रागात विक्रांत यांच्या डोक्यात लोखंड रॉड मारला. या घटनेत विक्रांत गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.
    12 वीत दोनवेळा नापास

    प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विक्रांत यांचा पोलिसांनी जबाब नोंदविला असून, आरोपी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपी विद्यार्थी 21 वर्षीय असून तो दोनवेळा बारावीत नापास झाला आहे.