जगात चौथ्या क्रमांकाचे मजबूत लष्कर भारताकडे

मागील काही वर्षापासून चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती रोखण्यासाठी भारताचा लष्करावरील होणाऱ्या खर्चात वाढ झाल्याचं दिसून येतंय. भारतीय लष्कराला अत्याधुनिक सुविधांनी सजग ठेवण्यासाठी मोठा खर्च करण्यात येतोय.

    नवी दिल्ली: जगामध्ये सर्वात मजबूत लष्कर असलेल्या सर्वेक्षणात भारताचा चौथा क्रमांक असल्याचे नुकत्याच केलेल्या एका अहवालातून समोर आले आहे डिफेन्स वेबसाइट असलेल्या मिलिटरी डायरेक्ट ने प्रसिद्ध केलेल्या नवीनअहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या नव्या अहवालानुसार भारताने १००पैकी ६१ गुण मिळवले आहेत. तारा चीनने १०० पैकी ८२ गुण मिळवले आहेत. या अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत सैन्य चीन देशाकडे तो प्रथम क्रमांकाचा देश आहे. तर अमेरिकेला ७४ गुण मिळाले असून अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, रशियाला ६९गुण मिळाले असून तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे. फ्रान्स पाचव्या स्थानावर आहे.

    लष्कराच्या मजबुतीचा अहवाल तयार करण्यापूर्वी वेगवेगळ्या कसोट्या लावण्यात आल्या होत्या. त्यात लष्करावर करण्यात येणारा खर्च, लष्करी सैन्याची संख्या, लष्कर, वायूदल आणि नेव्ही मध्ये असणारे एकूण क्षेपणास्त्रे, सरासरी पगार, लष्करी शस्त्र आणि त्याचे वजन अशा अनेक कसोट्यांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

    अमेरिकेकडून सर्वात जास्त म्हणजे ७३२ अब्ज डॉलर इतका खर्च लष्करावर करण्यात येतोय. त्यानंतर चीनचा लष्करावरील खर्च हा २६१ अब्ज डॉलर इतका आहे तर भारताचा खर्च हा ७१ अब्ज डॉलर इतका आहे. चीनची नेव्ही सर्वात बळकट आहे तर अमेरिकेचे वायूदल आणि रशियाचे लष्करही बळकट आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

    मागील काही वर्षापासून चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती रोखण्यासाठी भारताचा लष्करावरील होणाऱ्या खर्चात वाढ झाल्याचं दिसून येतंय. भारतीय लष्कराला अत्याधुनिक सुविधांनी सजग ठेवण्यासाठी मोठा खर्च करण्यात येतोय.