
अंमली पदार्थांच्या व्यापारासाठी भारताचा वापर ट्रान्झिट पॉइंट (तस्करीसाठी विनाअडथळा थांबा) म्हणून केला जात असून हेरॉईन जप्तीच्या प्रकरणात गेल्या चार वर्षांत ३७,००० टक्के वाढला असल्याची आकडेवारी समोर आली आहे. २०१८ मध्ये ८ किलोग्रॅमपासून ते २०२१ मध्ये ३ हजार किलोग्रॅमपेक्षा जास्त भारताने चार वर्षांमध्ये हेरॉईन जप्तीमध्ये आतापर्यंतची सर्वात जलद वाढ डीआरआयने (महसूल गुप्तचर संचालनालय) नोंदवली आहे. ही संस्था गुप्तचर आणि अंमलबजाणी संस्था आहे तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे (एनसीबी) अंमली पदार्थांची तस्करी आणि नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक अंतर्गत अवैध पदार्थांचा वापर रोखण्याचे काम आहे. विशेष म्हणजे कोरोनाकाळात प्रवासी निर्बंध असतानाही हेरॉईन जप्तीच्या प्रमाणात वाढ झाली आहे(India Transit Point for drug trafficking; Drug smuggling on the rise in Corona).
दिल्ली : अंमली पदार्थांच्या व्यापारासाठी भारताचा वापर ट्रान्झिट पॉइंट (तस्करीसाठी विनाअडथळा थांबा) म्हणून केला जात असून हेरॉईन जप्तीच्या प्रकरणात गेल्या चार वर्षांत ३७,००० टक्के वाढला असल्याची आकडेवारी समोर आली आहे. २०१८ मध्ये ८ किलोग्रॅमपासून ते २०२१ मध्ये ३ हजार किलोग्रॅमपेक्षा जास्त भारताने चार वर्षांमध्ये हेरॉईन जप्तीमध्ये आतापर्यंतची सर्वात जलद वाढ डीआरआयने (महसूल गुप्तचर संचालनालय) नोंदवली आहे. ही संस्था गुप्तचर आणि अंमलबजाणी संस्था आहे तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे (एनसीबी) अंमली पदार्थांची तस्करी आणि नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक अंतर्गत अवैध पदार्थांचा वापर रोखण्याचे काम आहे. विशेष म्हणजे कोरोनाकाळात प्रवासी निर्बंध असतानाही हेरॉईन जप्तीच्या प्रमाणात वाढ झाली आहे(India Transit Point for drug trafficking; Drug smuggling on the rise in Corona).
डीआरआच्या डेटा नुसार, २०१८ ते २०२१ पर्यंत, एजन्सीने जवळपास ३७ हजार ४०० टक्के जप्ती वाढवल्या आहेत. या आकडेवारीत डीआरआयद्वारे जप्त केलेल्या इतर जप्ती आणि या वर्षी जूनमध्ये एजन्सीकडून सुटलेली एक खेप वगळण्यात आली आहे, ज्यामध्ये जवळपास सहा हजार किलो हेरॉईन असल्याचा संशय होता. सप्टेंबरमधील जप्ती आणि जूनमध्ये सुटलेली जप्त दोन्ही – कथिरित्या एकाच आंतरराष्ट्रीय तस्करीच्या रॅकेटचा भाग आहेत. दोन्हींचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) सुरू आहे.
अफगाणिस्तानात अफूच्या पिकाच्या लागवडीत वाढ हे या मोठ्या वाढीमागचे एक कारण असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राइमच्या अहवालानुसार, अफगाणिस्तानमध्ये अफूच्या बेकायदेशीर लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीच्या क्षेत्रात 37% वाढ नोंदवली गेली आहे, ज्याचा ताबा या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने घेतला होता.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई विमानतळावर छापा टाकत पथकाने एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. मुंबई एनसीबीने मुंबईत काही ठिकाणी छापे टाकले असून, छापेमारीचे हे सत्र सुरूच आहे.. हे ड्रग्ज मुंबईहून ऑस्ट्रेलियाला कुरिअरने पाठवले जात होते. विमानतळावरून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांच्या कारवाईत एनसीबीने डोंगरी भागातील एका ३० वर्षीय तरुणाला ताब्यातघेतले आहे. त्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता कुरिअरच्या पाकिटावर होता ज्याद्वारे कुरिअर परदेशात पाठवण्यात येत होते. मुंबई विमानतळावरील कारवाईनंतर एनसीबीची छापेमारी सुरूच असल्याचे समजते.
पूर्वी इराण आणि इराक हे तस्करांचे पसंतीचे ट्रॉन्झिट पॉइंट होते. परंतु आता भारतमार्गे ड्रग्ज तस्करी केली जात आहे. रस्ते बदलत राहतात. पूर्वी इराण इराकद्वारे तस्करी होत होती. अधिकांश भागात ड्रग्जची चोरीही होत होती. वेगवेगळ्या देशांनी प्रतिबंधही लादले होते. आणि पाकिस्तान या देशांसोबत संबंध खराब करू इच्छित नाही त्यामुळेच भारत तस्करीसाठी मुख्य ट्रॉन्झिट पॉइंट ठरला आहे.
- शशिकांत शर्मा, माजी पोलिस महासंचालक, पंजाब