इंडियन मेडिकल असोसिएशनची पोलिसांत तक्रार; योगगुरु रामदेव यांची कोर्टात धाव

अ‍ॅलोपॅथी औषधांसंबंधात वादग्रस्त विधान केल्याने योगगुरु रामदेव अडचणीत सापडले आहेत. रामदेव यांनी कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी अॅलोपॅथी औषधी प्रभावी नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. असोसिएशनकडून विविध राज्यात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

    दिल्ली : अ‍ॅलोपॅथी औषधांसंबंधात वादग्रस्त विधान केल्याने योगगुरु रामदेव अडचणीत सापडले आहेत. रामदेव यांनी कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी अॅलोपॅथी औषधी प्रभावी नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. असोसिएशनकडून विविध राज्यात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

    या एफआयआरला स्थगिती देण्याची मागणी करीत त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. एफआयआरवरील कारवाईला स्थगिती द्यावी आणि या सर्व एफआयआर दिल्लीत वळते करावेत, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.