India's Sneha Dubey trends online for powerful response to Pakistan at UN

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भारताविरोधात गरळ ओकणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भारताच्या पहिल्या महिला सचिव स्नेहा दुबे यांनी अवैध पद्धतीने हस्तक केलेला पाकव्याप्त काश्मिरचा भारत तत्काळ रिकामा करा, अशा शब्दात खडसावत इम्रान खान यांची बोलतीच बंद केली. त्‍यांनी भारताची संयुक्‍त राष्‍ट्र आमसभेत भारताची वस्‍तुनिष्‍ठ भूमिका मांडलीच त्‍याचबरोबर पाकिस्‍तानचा दुटप्‍पीपणाही जगासमोर मांडला. दुबे यांनी केलेल्या पलटवाराचे कौतुक होत आहे. (India's Sneha Dubey trends online for powerful response to Pakistan at UN )

  दिल्ली : संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भारताविरोधात गरळ ओकणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भारताच्या पहिल्या महिला सचिव स्नेहा दुबे यांनी अवैध पद्धतीने हस्तक केलेला पाकव्याप्त काश्मिरचा भारत तत्काळ रिकामा करा, अशा शब्दात खडसावत इम्रान खान यांची बोलतीच बंद केली. त्‍यांनी भारताची संयुक्‍त राष्‍ट्र आमसभेत भारताची वस्‍तुनिष्‍ठ भूमिका मांडलीच त्‍याचबरोबर पाकिस्‍तानचा दुटप्‍पीपणाही जगासमोर मांडला. दुबे यांनी केलेल्या पलटवाराचे कौतुक होत आहे. (India’s Sneha Dubey trends online for powerful response to Pakistan at UN )

  अल्पसंख्यंकांची परिस्थिती बिकट

  पाकिस्तानच्या नेत्यांकडून यूएनच्या आंतरराष्ट्रीय मंचाचा दुरुपयोग खोटे आरोप आणि दुष्प्रचारासाठी केला जाणं हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही. ही गोष्ट अत्यंत खेदजनक आहे. जगाचं लक्ष आपल्या देशाच्या खराब परिस्थितीवरून हटवण्यासाठी पाकिस्तानकडून अशा मार्गांचा वापर केला जातो. पाकिस्तानात दहशतवादी बेछूटपणे वावरतात मात्र सामान्य नागरिक खासकरून अल्पसंख्यांकांची परिस्थिती बिकट आहे, अशा शब्दात दुबे यांनी इम्रान खान यांच्यावर हल्लाबोल केला.

  इम्रान खानचे आरोप

  संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना इम्रान खान यांनी भारतावर काही गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, अमेरिकेत 9/11 च्या हल्ल्यानंतर जगभरातील उजव्या विचारसरणीने मुस्लिमांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. याचा सर्वात मोठा प्रभाव भारत देशात पाहायला मिळाला. भारतामध्ये आरएसएस आणि भाजप मुस्लिमांना लक्ष्य करत आहे. मुस्लिमांमध्ये भेदभाव केला जात आहे. भारताने एकतर्फी पावले उचलत जबरदस्तीने काश्मीरवर कब्जा केल्याचा आरोपही इम्रान खांनी केला आहे.

  दहशतवाद्यांना प्रोत्साहन आणि मदत करण्याचा पाकिस्तानचा इतिहास आहे. विशेष म्हणजे याचा पाकिस्तानच्या धोरणातदेखील समावेश आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा वापर नेहमीच भारताविरोधात खोटे बोलण्यासाठी आणि जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केला आहे. ही पाकिस्तानची पहिलीच वेळ नाही. दहशतवादी पाकिस्तानात मुक्तपणे फिरत असून ओसामा बिन लादेनलाही पाकिस्तानने आश्रय दिला होता. पाकिस्तान ओसामा बिन लादेला आपल्या देशात शहीद म्हणून उल्लेख करतो.

  - स्नेहा दुबे, सचिव, भारत