आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर घसरल्या ; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर घसरल्या असल्यातरी देशांतर्गत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही. शुक्रवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९०.७८ रुपये तर डिझेलची किंमत ८१. १० रुपये प्रती लिटर एवढी होती. तर मुंबईत पेट्रोलची किंमत९७. १९ रुपये तर डिढेलची किंमत ८८.२० रुपये प्रती लिटर .

    नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर घसरल्या असल्यातरी देशांतर्गत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही. शुक्रवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९०.७८ रुपये तर डिझेलची किंमत ८१. १० रुपये प्रती लिटर एवढी होती. तर मुंबईत पेट्रोलची किंमत९७. १९ रुपये तर डिढेलची किंमत ८८.२० रुपये प्रती लिटर होती. मात्र, यापूर्वी सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले होते. दोन दिवसांत दिल्लीमध्ये पेट्रोल ३९ पैशांनी तर डिझेल ३७ पैशांनी स्वस्त झाले होते. तर गेल्या महिन्यात सलग १६दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या होत्या. साधारणपणे सर्वच शहरांत दोन्ही इंधनांच्या किंमती सातत्याने वाढत होत्या.

    कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या
    युरोपात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. गेल्या सत्रात बेंचमार्क कच्च्या तेलाच्या किंमती ४. टक्क्यांनी घसरल्या होत्या. ब्रेंट क्रूड (Brent crude oil)२. ७९ डॉलरच्या घसरणीसह ६१. ६२डॉलर प्रती बॅरलवर आले होते. यूएस वेस्ट टॅक्सस इंटरमीडियएट (WTI)ची किंमतही५.२टक्क्यांनी घसरून ५७. ९८ डॉलर प्रती बॅरलवर आली होती.