क्रिप्टोकरन्सी एक्स्जेंचे आयपी ॲड्रेस होणार ब्लॉक; डिजिटल करन्सी विधेयक लवकरच संसदेत

प्रस्तावित विधेयक संमत झाले आणि कायदा तयार झाला तर भारतात क्रिप्टोकरन्सी अवैध ठरणारी भारत ही पहिली अर्थव्यवस्था ठरणार आहे. चीनमध्येही मायनिंग व ट्रेडिंगवर बंदी आहे तथापि भारतात क्रिप्टोकरन्सी बाळगणेच गुन्हा ठरणार आहे. सर्व ट्रेडिंग एक्स्चेंजवर बंदी येईल आणि ती बाळगणे, विक्री करणे गुन्हा ठरविला जाणार आहे.

    दिल्ली: भारतात क्रिप्टोकरन्सीबाबत तूर्त अनिश्चिततेचे वातावरण आहे. दरम्यान केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सीत व्यवसाय करणाऱ्या फर्म अथवा एक्स्चेंजचे इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) ॲड्रेस ब्लॉक करणार असल्याचे वृत्त आहे. भारत सुरू असलेल्या देवाणघेवाणीच्या व्यवहारांचे क्रिप्टोकरन्सीचे हे आयपी ॲड्रेस सरकार ब्लक करणार आहे. क्रिप्टोकरन्सीबाबत सरकार कठोर नियम तयार करीत असून लवकरच संसदेतही डिजिटल करन्सी विधेयक संसदेत सादर करणार आहे.

    ट्रेडिंगवरही बंदी!

    उल्लेखनीय असे की यापूर्वी केंद्र सरकारने काही ॲडल्ट साईट्स व हजारो चायनीज साईट्सचे आयपी ॲड्रेस ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान क्रिप्टोकरन्सीतील व्यवसाय आणि गुंतवणुकीची परवानगी देणाऱ्या प्लॅटफॉर्मवरील सर्व सोर्स सरकार बंद करणार असल्याची माहिती जाणकारांनी दिली. आगामी काळात भारतातील गुंतवणूकदार क्रिप्टोकरन्सीत कोणत्याही प्रकारचे मायनिंग, ट्रेडिंग, ट्रान्सफर करू शकणार नाही, असेही जाणकारांनी सांगितले.

    कठोर शिक्षेची तरतूद
    प्रस्तावित विधेयक संमत झाले आणि कायदा तयार झाला तर भारतात क्रिप्टोकरन्सी अवैध ठरणारी भारत ही पहिली अर्थव्यवस्था ठरणार आहे. चीनमध्येही मायनिंग व ट्रेडिंगवर बंदी आहे तथापि भारतात क्रिप्टोकरन्सी बाळगणेच गुन्हा ठरणार आहे. सर्व ट्रेडिंग एक्स्चेंजवर बंदी येईल आणि ती बाळगणे, विक्री करणे गुन्हा ठरविला जाणार आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कठोर शिक्षा आणि दंडाचीही तरतूद विधेयकात आहे.