हे कधीच सुधारणार नाहीत! LOC जवळ ४०० दशहशतवादी एकत्र जमले; पाकिस्तानचे इरादे काय? लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

पाकिस्तानातील ३५० ते ४०० दशहशतवादी एलओसीजवळ बॉर्डर लॉन्च पॅड आणि दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमध्ये एकत्र येत आहेत. हा देशासाठी धोक्याचा इशारा असल्याचे मत लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी सांगितले आहे. पाकिस्तानी लष्कराकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे प्रमाण कमी झाले असले तरी त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत, असेही नरवणे यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या वतीने शीत युद्ध सुरु असल्याची माहितीही लष्करप्रमुखांनी दिली आहे(It will never improve! 400 terrorists gathered near LOC; What are Pakistan's intentions? Important information given by the Chief of Army Staff).

  नवी दिल्ली : पाकिस्तानातील ३५० ते ४०० दशहशतवादी एलओसीजवळ बॉर्डर लॉन्च पॅड आणि दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमध्ये एकत्र येत आहेत. हा देशासाठी धोक्याचा इशारा असल्याचे मत लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी सांगितले आहे. पाकिस्तानी लष्कराकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे प्रमाण कमी झाले असले तरी त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत, असेही नरवणे यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या वतीने शीत युद्ध सुरु असल्याची माहितीही लष्करप्रमुखांनी दिली आहे(It will never improve! 400 terrorists gathered near LOC; What are Pakistan’s intentions? Important information given by the Chief of Army Staff).

  २०२१ मध्ये फ्ब्रुवारीत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी मिळून, शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येणार नाही, यावर सहमंती दर्शवली होती. वास्तविक पाहता २००२ पासून याबाबत सहमती होती, मात्र तरीही पाकिस्तानकडून सातत्याने याचे उल्लंघन होत होते. गेल्या वर्षी फेब्रुवारीनंतर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे प्रमाण कमी झाले आहे. अशा केवळ दोनच घटना समोर आल्या आहेत. काही प्रमाणात सीमेवर तणाव थोडा निवळला म्हणावा, अशी स्थिती आहे, मात्र तरीही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असून, त्यांनी आता शीत युद्ध पुकारले आहे.

  धोका अजून टळलेला नाही, सतर्क राहण्याची गरज

  संयुक्त गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, सीमेपलिकडे लॉन्च पॅड आणि दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये ३५० ते ४०० दहशतवादी एकत्रित आलेले आहेत. याचाच अर्थ अद्याप धोका टळलेला नाही, असे लष्करप्रमुखांनी सांगितले आहे. भारतीय सैन्याने सतर्क राहण्याची गरजही त्यांनी वर्तवली आहे. पश्चिम दिशेने धओका अजूनही जास्त आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचे नरवणे यांनी सांगितले आहे.

  नियंत्रण रेषेच्या पहिलकडे लॉन्चपॅडवर जमलेले दहशतवादी आणि वारवंरा घुसखोरीचे असफल प्रयत्न, यातून पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा सातत्याने पर्दाफाश होतो आहे. भारताने दहशतवादाबाबत झीरो टॉलरन्स अशी भूमिका स्वीकारली असल्याने, यासाठी कोणत्याही किंमतीवर आम्ही त्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे नरवणे यांनी सांगितले.

  काश्मीर खोऱ्यांत आता दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत मिळेना

  जम्मू-काश्मीरच्या स्थिती गेल्या दोन वर्षांत मोठी सुधारणा झाली आहे. आता दहशतवाद्यांना स्थआनिकांची मदत मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे दहशतवादी शांततेचा भंग करण्यासाठी अल्पसंख्याकांवर, बाहेरुन येणाऱ्या मजुरांवर गोळीबार करुन त्यांना लक्ष्य करत असल्याचे नरवणे यांनी सांगितले. या आव्हांनाचा सैन्यदल समर्थपणे मुकाबला करत असल्याचेही नरवणेंनी स्पष्ट केले.

  ड्रोनशी संबंधित धोक्याबाबतही नरवणेंनी यावेळी माहिती दिली. त्यांनी सांगितले की या ड्रोन्सचा उपयोग दहशतवाद्यांना लॉजिस्टिक मदत मिळवण्यासाठी करण्यात येतो आहे. या धोक्याची आम्हाला जाणीव आहे, आणि हे संकट टाळण्यासाठी योग्य पावले उचलण्यात आली आहेत.

  हे सुद्धा वाचा
  • 2022