jack ma

ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाचा मालक जॅक मा द्वारे सार्वजनिकरित्या चीनच्या वित्तीय नियामक आणि बँकांवर टीका करणे चांगलेच भारी पडले आहे. चीनी सरकारकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर जॅक माच्या संपत्ती गेल्या दोन महिन्यात ११ अब्ज डॉलरची घट झाली आहे. जॅक माने चिनी वित्तीय नियमाकांना जोखीम स्वीकारत नसल्यावरून फटकारले होते. त्यांनी चीनच्या बँकांवर सावकारीचा आरोप केला होता. चीनी बँका गहाण ठेवल्यानंतरच कर्ज देतात, यावर त्यांचा रोख होता.

दिल्ली (Delhi).  ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाचा मालक जॅक मा द्वारे सार्वजनिकरित्या चीनच्या वित्तीय नियामक आणि बँकांवर टीका करणे चांगलेच भारी पडले आहे. चीनी सरकारकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर जॅक माच्या संपत्ती गेल्या दोन महिन्यात ११ अब्ज डॉलरची घट झाली आहे. जॅक माने चिनी वित्तीय नियमाकांना जोखीम स्वीकारत नसल्यावरून फटकारले होते. त्यांनी चीनच्या बँकांवर सावकारीचा आरोप केला होता. चीनी बँका गहाण ठेवल्यानंतरच कर्ज देतात, यावर त्यांचा रोख होता.

अलीबाबा आणि अॅन्ट ग्रुपवर कारवाई सुरू
उल्लेखनीय आहे की, चीनमधील सर्वाधिक बँका सरकारी आहेत. यामुळे त्यांची टीका थेट सरकारविरोधात मानली गेली. चीनने जॅक माची ई-कॉमर्स कंपनी अलीबाबा आणि त्याची आर्थिक व्यवसाय शाखा अॅन्ट ग्रुपवर कारवाईही सुरू केली आहे. मात्र, बाजारात एकाधिकार प्रस्थापित करण्याच्या अलीबाबा कंपनीच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी ही कारवाई सुरू करण्यात आल्याचे चीनच्या मार्केट रेगुलेटरचे म्हणणे आहे. चिनी सरकारच्या कारवाईमुळे कंपन्यांवर प्रचंड दबाव निर्माण झाला असून चीनमधील मोठ्या कंपन्यांचे सुमारे 15 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.