JEE, NEET परीक्षा : शिक्षणमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना दिलासा; अभ्यासक्रम कपातीचा निर्णय मात्र विचाराधीन

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई आणि नीट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री पोखरियाल यांनी जेईई मेन्स-2021 आणि नीट-2021 परीक्षांचा अभ्यासक्रम कमी करण्याचा सरकार विचार करीत आहे, असे सांगितले. निशंक म्हणाले की, जेईई मेन परीक्षा सध्या वर्षांतून दोनदा घेतली जाते. यापुढे ही परीक्षा तीन ते चार वेळा घेता येईल का?, याबाबत सरकारी स्तरावर विचार केला जात आहे.

दिल्ली (Delhi).  केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई आणि नीट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री पोखरियाल यांनी जेईई मेन्स-2021 आणि नीट-2021 परीक्षांचा अभ्यासक्रम कमी करण्याचा सरकार विचार करीत आहे, असे सांगितले. निशंक म्हणाले की, जेईई मेन परीक्षा सध्या वर्षांतून दोनदा घेतली जाते. यापुढे ही परीक्षा तीन ते चार वेळा घेता येईल का?, याबाबत सरकारी स्तरावर विचार केला जात आहे.

अटेम्प्ट्स वाढवणार
जॉईंट एन्ट्रन्स एक्झाम (जेईई) वर्षातून दोन वेळा होते, ती आता तीन ते चार वेळा घेता येईल का याबाबत सरकार विचार करीत आहे. नीट परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्यायची की ऑनलाईन घ्यायची याबाबत विचारविनिमय सुरू आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत नीट परीक्षा रद्द होणार नाही. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा आयोजित केल्या जातील. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. कोरोनाची स्थिती काय असेल, त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील. – रमेश पोखरियाल निशंक, केंद्रीय शिक्षण मंत्री (Ramesh Pokhriyal Nishank, Union Minister of Education)

JEE, Neat Exam (प्रतिकात्मक फोटो)

सीबीएसई विद्यार्थ्यांनी चिंता करू नये (CBSE students should not worry)
केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी गुरुवारी विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर वेबिनारद्वारे संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून जेईई, नीट, सीबीएसई परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात विविध प्रश्नांचे काहूर माजलेले आहे. वेबिनारद्वारे विद्यार्थ्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन पोखरियाल यांनी त्यांच्या सर्व शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. सीबीएसई 10 वी आणि 12 विच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तारखेवरून चिंता करण्याची गरज नाही. सीबीएसईची परीक्षा सुरू होण्याच्या खूप दिवस आधी तारखा जाहीर केला जातील. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल. सीबीएसई बोर्डानेदेखील परीक्षेच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केली आहे, असेही पोखरियाल यांनी स्पष्ट केले.

गुणपत्रिकेवरून अनुत्तीर्ण शब्द वगळला (Unsuccessful word omitted from mark sheet)
सीबीएसई बोर्डाने गुणपत्रिकेवरून अनुत्तीर्ण शब्द वगळला आहे, अशी माहितीही पोखरियाल यांनी यावेळी दिली. ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेले शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण आणखी उत्तम करण्याबाबत प्रयत्न सुरू आहे. भारताच्या नव्या शिक्षण धोरणाचे संपूर्ण जगात कौतुक केल्या जात आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, शाळा नेमक्या उघडणार तरी कधी हा विद्यार्थ्यांचा कळीचा प्रश्न होता. अनेक विद्यार्थ्यांनी हा प्रश्न विचारला. प्रत्येक राज्यातील कोविड-19 विषाणू संक्रमणाची स्थिती लक्षात घेऊन ते-ते राज्य शाळा उघडण्याबाबतचा निर्णय घेईल असे ते म्हणाले. आतापर्यंत 17 राज्यांनी शाळा प्रत्यक्ष उघडल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.

कोरोना महामारी काळात नॅशनल टेस्ट अभ्यास अॅपची विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी खूपच मदत झाल्याचे पोखरियाल यांनी सांगितले. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विकसित केलेल्या या अॅपच्या मदतीने लाखो विद्यार्थ्यांनी जेईई-2020 आणि नीट 2020 परीक्षेचा सराव केल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.