kanhaiyaa and mewani in congress

कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांनी(Kanhaiya Kumar And Jignesh Mewani Joins Congress) काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

    नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी(Kanhaiya Kumar And Jignesh Mewani Joins Congress) काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. कन्हैय्या कुमार हे शहीद भगतसिंग यांच्या जन्मदिनी म्हणजे २८ सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे आधीच पक्क झालं होतं. त्यानुसार आज दिल्लीमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

    या दोन तरुण नेतृत्वांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळं काँग्रेसला आता नवं बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांनी सातत्यानं मोदी सरकारला विरोध केला आहे. आमच्या या साथीदारांना वाटलं ही हा आवाज अजून बुलंद व्हावा. त्यामुळे त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा आवाज आता काँग्रेस आणि राहुल गांधींच्या आवाजात मिळून ‘एक और एक ग्यारह’ होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते आणि मुख्य प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.